आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंप्राळ्यात दुकानाला आग; 50 हजारांचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पिंप्राळ्याच्या सोमाणी मार्केटमधील ‘विशाल चप्पल’ या दुकानाला आग लागून सुमारे 50 हजार रुपयांचा माल जळाला. आग विझविण्यासाठी गोलाणी मार्केटमधील महापालिकेच्या अग्निशमन कार्यालयाला फोन लावूनही कोणी न उचलल्याने शेवटी महाबळ कॉलनीतून पालिकेचा अग्निशमन बंब मागविण्यात आला. त्यामुळे तब्बल अर्धातास उशिरा अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचला.

सोमाणी मार्केटमधील दुकान क्रमांक 33 येथे रतन दर्डेकर यांचे ‘विशाल चप्पल’ नावाने रेडिमेड चप्पल विक्रीचे व दुरुस्तीचे दुकान आहे. संध्याकाळी लक्ष्मीपूजन करून ते शनिपेठेत घरी गेले. रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानातून धूर येत असल्याची माहिती मिळाली. यावेळी अनेक नागरिकांनी पालिकेच्या गोलाणी मार्केट येथील अग्निशमन विभागाच्या 2224444 या क्रमांकावर दूरध्वनीवर संपर्क साधला. मात्र कोणीही फोन उचलला नाही.

रामानंद पोलिस ठाण्यात याबाबत माहिती कळविल्यानंतर त्यांनी महाबळ कॉलनीतील अग्निशमन बंब मागविला. रामानंद पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल आर.एस.पाटील, संभाजी पाटील हे घटनास्थळी पोहचले त्यांनी पंचनामा केला. दिवाळीत आगीच्या लहान मोठय़ा घटना घडतात. अशा वेळी अग्निशमन विभाग तत्पर राहणे अपेक्षित असते. याबद्दल नागरिकांचा संताप होत होता.