आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात दुकानाला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साई आनंद स्वीटला आग लागल्यानंतर जमा झालेली गर्दी. - Divya Marathi
साई आनंद स्वीटला आग लागल्यानंतर जमा झालेली गर्दी.
धुळे- शहरातील ऊस गल्लीत असलेल्या साई आनंद स्वीटला रविवारी दुपारी आग लागली. त्यानंतर काही वेळातच महापालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. 
 
शहरातील पाचकंदीलपासून काही अंतरावर असलेल्या ऊसगल्लीत हितेश चांदवाणी यांचे साई आनंद स्वीट दुकान आहे. या दुकानातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. काही वेळातच आगीचे प्रमाण वाढले. दरम्यानच्या काळात परिसरातील नागरिकांनी महापालिकेला कळविले. त्यामुळे अग्निशमन बंब दाखल झाले. सुमारे तीन बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले; परंतु ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी आझादनगर पोलिसांशी संपर्क साधला असता तक्रार देण्यास अद्याप कोणीही आले नसल्याची माहिती देण्यात आली. 
 
बातम्या आणखी आहेत...