आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire Bigred Department Attendance Book News In Marathi

हजेरी बुक गहाळप्रकरणी गुन्हा दाखल करणार, चौकशीला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या एमआयडीसीतील अग्निशमन विभागातील हजेरी बुक गहाळप्रकरणी चौकशी अधिकारी उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी शुक्रवारी चौकशीला सुरुवात केली. सगळ्यात आधी हजेरी पुस्तक गहाळप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगत यातून कोणाचीही सुटका होणार नसल्याचे संकेत दिले. याच विषयावर स्थायी समितीतही चिंता व्यक्त करण्यात आली

एमआयडीसीतील अग्निशमन कार्यालयातून १७ जानेवारीपासून हजेरी बुक लांबवण्यात आले होते. चार दिवसांनंतर २१ रोजी ते थेट ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात पोहोचवण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आयुक्त संजय कापडणीस यांनी यामागील नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे आदेश उपायुक्त गांगोडे यांना दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजता गांगोडे यांनी अग्निशमन विभाग प्रमुख वसंत कोळी यांना बोलावून विभागाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. कोळी यांनी दिलेल्या नोटीसप्रकरणी केंद्रप्रमुख शशिकांत बारी यांनी खुलासाही सादर केला. दरम्यान, बारी यांनी उपायुक्तांची भेट घेतली. झालेला प्रकार गंभीर असतानाही त्याची जबाबदारी नाकारणे आणखी गंभीर असल्याचे गांगोडे यांनी ठणकावून सांगितले. असे करण्यामागे नेमके कारण काय? याचाही आता शोध सुरू केला आहे.

हजेरी बुकबाबत गांभीर्याने घेतल्याने सगळ्यांनाच परिणाम भोगावे लागतील तसेच गहाळ केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला. शनिवारी गांगोडे पूर्णवेळ या विषयावर लक्ष केंद्रीत करून दोषी व्यक्तीचा शोध घेतला जाईल. जो कुणी दोषी असेल त्याची गय केली जाणार नाही, असाही इशारा उपायुक्त यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला.

महापालिकेचे हजेरी बुक
महापालिकेच्या सभेतही हजेरी बुकावर चर्चा

स्थायीसमिती सभापती ज्योती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सभा झाली. या वेळी सदस्य संदेश भोईटे यांनी अग्निशमनचे हजेरी बुक गहाळ प्रकरणाचे काय झाले? असा प्रश्न केला. तर नितीन लढ्ढा यांनी हजेरी बुकची सखाेल चौकशीची मागणी केली. मस्टरमध्ये टॅग लावण्यामागे काय हेतू होता? त्यातून काय निदर्शनास आणायचे होते याचाही शोध घेण्याची गरज आहे. घडलेला प्रकार हा कटकारस्थान असून स्थानिक कर्मचाऱ्यांचेच असावे. हा प्रकार घडल्यानंतर वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. परंतु वृत्तपत्रातून याला वाचा फोडण्यात आल्याचे लढ्ढा म्हणाले.

संबंधितांचा शोध घेणे सुरू
घडलेलाप्रकार हा कार्यालयीन शिस्तीला धरून नाही. त्यामुळे संबंधितांचा शोध घेतला जाईल. याप्रकरणात उपायुक्तांकडे प्रकरण सोपवले असून निश्चित कारवाई केली जाईल, तोव असे करण्यामागे नेमका काय हेतू होता याचाही शोध घेतला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी स्थायी समिती सभेत स्पष्ट केले.