आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हावडा एक्स्प्रेसच्या पँट्री कारमध्ये भडकली आग, व्यवस्थापकाच्या सतर्कतेने दुर्घटना टळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - धरणगावकडून जळगावकडे येत असलेल्या अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसच्या पँट्री कारमधील (रसोई भंडार यान) गॅस सिलिंडरच्या नळीने अचानक पेट घेतल्याने आग लागली. या वेळी क्षणाचाही विलंब न करता पँट्री कारच्या व्यवस्थापकाने माेठ्या हिमतीने सिलिंडरचा काॅक बंद केल्याने आग पसरली नाही. त्यामुळे माेठा अनर्थ टळला.
ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजता चावलखेडा रेल्वेस्थानक परिसरात घडली. दरम्यान, घटनेची माहिती कळल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण हाेऊन गाेंधळ उडाला हाेता.
अहमदाबाद-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस धरणगावकडून जळगावकडे रविवारी येत हाेती. सकाळी १०.३० वाजता चावलखेडा स्थानकाकडे येत असताना गाडीतील पँट्री कारमधील गॅस सिलिंडरच्या नळीने अचानक पेट घेतल्याने धूर निघू लागला. ही बाब व्यवस्थापक रामू गुप्ता यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ सिलिंडरचा काॅक बंद करून आग विझवली. त्यामुळे आग इतरत्र पसरली नाही. गाडीत सुमारे १८०० प्रवासी हाेते.
बातम्या आणखी आहेत...