आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचऱ्याला आग लावल्याने मोटारसायकल जळाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव मू.जे.महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुलाबाहेर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी कचऱ्याला लावलेल्या आगीत एक मोटारसायकल आणि दोन सायकलींचे टायर जळाले. तसेच एका मोटारसायकलचे लाइट, पुढचे मडगार्ड खाक झाले.
एकलव्य क्रीडा संकुलात सध्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आंतर महाविद्यालयीन क्रिंकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धांसाठी फैजपूर येथील फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी शनिवारी सकाळी वाजता आले होते. त्यांनी क्रीडा संकुलाच्या बाहेर त्यांच्या मोटारसायकल लावल्या होत्या.
त्याचवेळी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गवत तोडून पेटवले. त्यानंतर गवत लांबपर्यंत पेटत गेले. त्यामुळे अशफाक शेख या विद्यार्थ्याची हीरो ग्लॅमर मोटारसायकलचे (एमएच-१९-बीके-२७६६) पुढचे मडगार्ड, टायर, हेडलाइट आणि एका लाल रंगाच्या हीरो प्लेझर मोपेडचे टायर जळाले. तसेच दोन सायकलींचेही टायर जळाले आहेत. मैदानातील काही खेळाडू बाहेर आल्यानंतर त्यांना ते जळाल्याचे दिसले. त्यांनी ओरडा ओरड करून विद्यार्थ्यांना बोलावून आग विझवली. यासंदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळावर पपोहोचले. त्यांनी गाड्या ताब्यात घेऊन अकस्मात घटनेची नोंद केली आहे.
बातम्या आणखी आहेत...