आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजेरी बुक ‘दिव्य मराठी’ कार्यालयात, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, अधिकारी गाफील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या गलथान कारभाराचा आणखी एक नमुुना चव्हाट्यावर आला आहे. अग्निशमन विभागाचे हजेरी बुक गेल्या पाच दिवसांपासून गहाळ झाले असून हे हजेरी बुक गहाळ झाल्याचा गंधही अधिकारी-कर्मचाऱ्यांना नसल्याचे दिसून आले आहे. अग्निशमन विभागाचे हे हजेरी बुक बुधवारी दोन अज्ञात व्यक्तींनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात आणून दिले. त्या वेळी पालिकेचा भोंगळ कारभार आणि कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार,निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला. दरम्यान, हा प्रकार सायंकाळी आयुक्तांच्या कानावर घालताच तेही चकीत झाले. बेजबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही आयुक्त कापडणीस यांनी दिली.

बुधवारी दुपारी १२.३० ते वाजेदरम्यान दोन अज्ञात व्यक्ती एक पिस्ता रंगाचे मोठे पाकीट घेऊन ‘दिव्य मराठी’च्या नवीपेठेतील कार्यालयात आले आणि ते पाकीट सुरक्षारक्षकाच्या हाती देऊन निघून गेले. या पाकिटावर ‘दिव्य मराठी,’ जलगाव असे हिंदी भाषेत लिहिलेले होते.पाकीट कशाचे आहे? असे सुरक्षा रक्षकाने विचारले असता, इमारतीच्या बाहेर खाली पडले होते, असे त्या अज्ञात व्यक्तींनी सांिगतले. संबंधितांनी याबाबत माहिती वरिष्ठांना दिली. अधिक चौकशी केली असता, त्या पाकिटात चक्क महापालिकेच्या एमआयडीसी अग्निशमन दलाचे गेल्या वर्षभराचे हजेरी पुस्तक असल्याचे निदर्शनास आले. कोणीतरी अग्निशमन कार्यालयातून हे हजेरी पुस्तक ताब्यात घेतले. मात्र, याचा थांगपत्ताही कर्मचाऱ्यांना लागला नाही. यात चालू महिन्याचे अर्थात जानेवारी २०१५ ची सुद्धा हजेरी आहे. कर्मचाऱ्यांची शेवटची स्वाक्षरी १६ जानेवारी रोजी झाली असून त्यानंतरच्या स्वाक्षरी कुठे केल्या जात आहेत, हा एक प्रश्नच आहे. पाच दिवसांपासून हजेरी पुस्तक गहाळ असताना त्याची दखल घेण्याची गरज संबंधिताना वाटली नाही, हे विशेष. हे हजेरी पुस्तक काेणी नेले, यामागे नेमका उद्देश काय? अग्निशमन कार्यालयातून हजेरी पुस्तक गायब होते तोपर्यंत अधिकारी, कर्मचारी काय करत होते? असे एक ना अनेक प्रश्न आता डौके वर काढत आहेत.

हजेरीबुकबाबत अधिकारी अनभिज्ञ.
* १६ जानेवारीच्या स्वाक्षरी आहेत, त्या दिवशी मस्टर कार्यालयातून गायब झाले असल्यास वरिष्ठ होते कुठे?
* खिशात टाकून नेण्या एवढे छोटे हजेरी मस्टर नाही, त्यामुळे कार्यालयातून मस्टर नेणारा कर्मचारी काेण?
* एखाद्या बाहेरील व्यक्तीला हे मस्टर सापडले असेल तर ते पालिकेच्या ताब्यात का दिले गेले नाही?
* वृत्तपत्राच्या कार्यालयात पाकिटात बंद करून पाठवण्यामागील संबंधिताचा नेमका उद्देश काय?
* काही महिन्यांच्या दरम्यान टॅग लावले आहे, नेमके काेणत्या बाबींकडे संबंधिताला लक्ष वेधायचे आहे?

मस्टरवर स्वाक्षऱ्या नियमित सुरू
-एमआयडीसीअग्निशमन युनिटमधील कर्मचारी नियमितपणे हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करत आहेत. कर्मचारी आठ-आठ दिवस हजेरी पुस्तकात सह्या करीत नाही, या आरोपामध्ये तथ्य नाही. शशिकांतबारी, केंद्र प्रमुख, एमआयडीसी अग्निशमन
या प्रकरणाची चौकशी करणार

-एखाद्याविभागातील हजेरी पुस्तक गायब होणे ही गंभीर बाब आहे. याबाबत उपायुक्तांच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल. यात जे काेणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार. संजयकापडणीस, आयुक्त, महापालिका