आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

52 मिनिटात विझवली मालगाडीला लागलेली आग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कोळशाच्या मालवाहू रेल्वेच्या मागील चार डब्यांना उष्णतेमुळे आग लागल्याची घटना रविवारी दुपारी 2.50 वाजता लक्षात आली. जळगाव रेल्वेस्थानकावर 52 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात आली.

पुण्याहून नागपूरकडे जाणार्‍या कोळशाच्या मालगाडीच्या मागील चार डब्यांना आग लागल्याचे शिरसोली रेल्वेस्थानकावरील कर्मचार्‍याला 2.50 मिनिटांनी लक्षात आले. त्याने तत्काळ जळगाव पॅनलला या संदर्भात माहिती दिली. जळगाव स्थानकावर आग विझवण्यासाठी महापालिकेचे 3 अग्निशामक बंब तसेच 10 कर्मचारी त्वरित हजर झाले. जळगाव रेल्वेस्थानकाच्या 4 क्रमांकाच्या फलाटावर ही गाडी लावण्यात आली. दुपारी 3.40 मिनिटांनी आग विझवण्यास सुरुवात केली. 4 वाजून 52 मिनिटांनी आग आटोक्यात आली. सुदैवाने आग इतरत्र न पसरल्याने जीवित तसेच वित्तहानी टळली.

मालगाडी पीपीडीडी येथून बीआरएसएम येथे जाणार्‍या गाडीला आग लागली. या मालगाडीत इंडोनेशिया येथून आयात केलेला दगडी कोळसा असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातील अधिकार्‍यांनी दिली. आग विझवताना तासभर या भागातील वीजप्रवाह बंद करण्यात आला होता.