आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार : आग, गॅस गळतीची सूचना माेबाइलवर, पाचोऱ्याच्या योगेश बारीने शोधले यंत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गॅस गळती, शाॅर्टसर्किट अन्य कारणांमुळे घरात किंवा दुकानात अचानक अाग लागण्याच्या घटना घडतात. यात अार्थिक नुकसानीसह काही वेळा प्राणहानी हाेते. अशी अाग राेखण्यासाठी पाचाेरा येथील याेगेश बारी या तरुणाने ‘अग्नी सुरक्षा कवच’ तयार केले अाहे. अाग लागताच हे यंत्र घर, दुकान मालकांच्या माेबाइलवर संदेश पाठवते. धुरामुळे माेठ्याने वाजणारा सायरन लोकांना सतर्क करतो आणि आग लवकर आटोक्यात आणता येऊ शकते.

पाचाेरा येथील याेगेश नथ्थू बारी यास बालपणापासून वैज्ञानिक उपकरणे तयार करण्याचा छंद अाहे. विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शन, मदत करतो. महिलांसाठीसुरक्षा जॅकेट तयार केले : काॅम्प्युटरडिप्लाेमा झालेल्या याेगेशने यापूर्वीचाेरांना पळवणारे यंत्र, इंजिन कुलिंग सिस्टिम, माेबाइलवर चारचाकी सुरू करणे, दुचाकीचे मायलेज वाढवणारे यंत्र, महिलांना सुरक्षा देणारे ‘शाॅक जॅकेट’, दुकान घराचे चाेरट्यांपासून रक्षण करणारे ब्रह्मास्त्र कवच, माेटारसायकल माेबाइल इंडिकेटर किट तयार करण्यात अाले आहे. यातील महिलांना सुरक्षा देणारे शाॅक जॅकेट खूपच गाजले हाेते. दरम्यान, माेबाईलदद्वारे गॅस गळती त्याचप्रमाणे अाग लागल्याची सुचना मिळाल्यानंतर अापले घर वाचवणे नागरिकांना या यंत्रामुळे साेपे हाेणार अाहेे.

यंत्रास 9 हजार खर्च
बॅटरीवरचालणारे हे अग्नी सुरक्षा कवच (यंत्र) तयार करण्यासाठी 9 हजार २०० रुपये खर्च आला आहे. यात एक स्टील पेटी, १२ व्हाेल्ट बॅटरी, सायरन, सेन्सर सर्किट, वाॅटर बॅटरी, चार्जर, स्वीच, माेबाइल, रिले सर्किट, फ्यूज, रिमाेट कंट्राेल सर्किट अादी साहित्य वापरण्यात आले.
पुढे वाचा... धूर निघताच सेन्सरसह मोबाइल सर्किट सक्रिय
बातम्या आणखी आहेत...