आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडरूमला अाग लागून 30 हजारांच्या नोटा खाक, शॉर्टसर्किटमुळे भडका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूण मधील चटोरी गल्लीतील बिर्याणी हाऊसच्या वरच्या मजल्यावरील घराच्या बेडमरूमध्ये शुक्रवारी सकाळी १० वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत कपाटातील रोख ३० हजार रूपयांच्या नोटांसह सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला.
 
मेहरूणमधील चटोरी गल्लीत बिर्याणी हाऊसच्यावर फिरोज खान रमजान खान यांचे घर आहे. या घरातील बेडरूममध्ये सकाळी १० वाजता शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे बेडरूममध्ये आग लागली. या आगीमध्ये लॅपटॉप, ए.सी.,वायरिंग तसेच कपाटात ठेवलेल्या ३० हजार रूपयांच्या नोटा खाक झाल्या आहेत. बेडरूमच्या शेजारी असलेल्या किचनमध्ये भरलेला सिलिंडर होता. किचनच्या दिशेने आग येवू लागली होती. खान कुटुंबीयांनी तातडीने किचनमधील सिलिंडर काढून खाली आणला. आग वाढत चालली होती. त्यामुळे खान कुटुंबीयांनी बोअरिंग सुरू करून बेडरूममध्ये पाणी मारून विझवण्याचा प्रयत्न केला. थोड्याच वेळात आग आटोक्यात आली. औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात फिरोज खान यांनी दिलेल्या माहितीवरून आगीत सुमारे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...