आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: जिनिंग मिलमधील कापसाला भीषण अाग; 2 काेटींचे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- अार्वी येथील एकवीरा जिनिंग मिलला शुक्रवारी पहाटे अचानक अाग लागली. या अागीत कापसावर प्रक्रिया केलेल्या अाठशे कापसाच्या गाठी, कच्चा माल अादीचे जळून नुकसान झाले. अाग विझविण्यासाठी धुळे महानगरपालिका, टाेल नाका अाणि मालेगाव महापालिका अग्निशमन दलाच्या बंबांची मदत घेण्यात अाली. दुपारपर्यंत अागीमुळे नुकसान झालेला कापूस काढण्याचे काम सुरू हाेते. 

शहरातील पवन श्रीकिशन अग्रवाल यांच्या मालकीची अार्वी येथील बाेरकुंड रस्त्यावर एकवीरा काॅटन िलमिटेड नावाची जिनिंग कंपनी अाहे. या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्यावर प्रक्रिया करण्याचे काम केले जाते. तीन शिफ्टमध्ये िमलचे कामकाज चालते. अाधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने संपूर्ण प्रक्रिया चालत असल्याने मिलमध्ये माेजके १५ ते २० कामगार अाहेत. नेहमीप्रमाणे रात्रीच्या िशफ्टमधील काम सुरू असताना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अचानक अाग लागल्याची घटना तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या लक्षात अाली. त्यांनी माेबाइलद्वारे ही माहिती पवन अग्रवाल यांना िदल्यानंतर त्यांनी धुळे महानगरपालिका अग्निशमन दलाला कळविले. त्यानुसार पवन अग्रवाल यांच्यासह अग्निशमन दलाचा बंब पाच वाजेच्या सुमारास िमलमध्ये पाेहाेचले. मिलमध्ये माेठ्या प्रमाणावर कापूस हाेता. 
 
अाग प्रत्यक्षात िदसत नसली तरी कापसामधून धूर निघत हाेता. कापूस माेकळ्या जागेवरील िमल यामुळे हवेने अाग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मनपासह टाेल नाका अाणि मालेगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण केले. चार बंबांच्या मदतीने धूर निघत असलेल्या कापसावर पाणी मारण्यात अाले. सकाळी वाजेनंतर मालेगाव टाेल नाक्याचा बंब परत पाठविण्यात अाला. मात्र, दुपारी तीन वाजेपर्यंत मनपाच्या दाेन बंबांच्या मदतीने पाणी मारणे सुरू हाेते. जळालेल्या कापसातून चांगला कापूस बाजूला काढून ताे परिसरात वाळविण्यासाठी ठेवण्यात अाला. अागीमुळे, पाण्यामुळे कापूस अाेला हाेऊन सुमारे दाेन काेटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात अाहे.
 
सुदैवाने या घटनेत काेणाला दुखापत अथवा इजा झाली नाही. अाग विझविण्यासाठी मालक पवन अग्रवाल, त्यांचा मुलगा मयंक, कर्मचारी, मनपा अग्निशमन दलाचे अतुल पाटील, विनाेद साेनवणे, दगडू माेरे, श्याम कानडे, भगवान गवळी, याेगेश मराठे यांनी परिश्रम घेतले. घटनास्थळी भाजपचे महानगर िजल्हाप्रमुख अनुप अग्रवाल तसेच शहरातील काही व्यापाऱ्यांनी सकाळी भेट दिली. 

अग्रवाल परिवाराच्या माणुसकीचे दर्शन 
पाचवाजेपासून अाग विझविणे, कापूस बाहेर काढण्याचे काम करीत हाेते. त्यात महाशिवरात्रीनिमित्त अनेकांचा उपवास हाेता. मिल अार्वीपासून बाेरकुंड रस्त्यावर दाेन िकलाेमीटरवर अाहे. त्या ठिकाणी साधी चहाचीही व्यवस्था नाही. याची जाणीव ठेवून अग्रवाल परिवाराचे या घटनेत माेठे नुकसान झाले असताना त्यांनी या ठिकाणी काम करणाऱ्या साबुदाणा खिचडीचे वाटप केले. 

माेठा अनर्थ टळला 
अार्वीगावापासून दाेन िकलाेमीटर अंतरावर असलेल्या या मिलमध्ये असलेल्या विहिरीतून दाेन िठकाणी पाण्याची व्यवस्था केली गेली अाहे, तर माेठी टाकीही पाण्याने भरण्यात येते. त्या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या बंबांत पाणी भरून अाग विझविली गेली. पाण्याची उपलब्धता या ठिकाणी नसती, तर पाण्यासाठी बंबांना अार्वी शिवार किंवा थेट धुळे एमअायडीसीपर्यंत यावे लागले असते. त्या काळात अाग लागून अधिक नुकसान झाले असते. मात्र, पाण्याच्या उपलब्धतेमुळे माेठा अनर्थ टळला. दरम्यान, आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. दरम्यान, जिल्ह्यात यापूर्वीही काही जिनिंग मिलमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. 
 
दहा िदवस काम बंद राहणार... 
सद्य:स्थितीतिमलमध्येमाेठ्या प्रमाणावर कापूस अाहे. अाग पाण्यामुळे ताे खराब झाला अाहे. त्यातील चांगला कापूस पुन्हा वापरता येऊ शकत असल्याने त्याला वाळविण्यात येणार अाहे. खाेल्या कापूस काढून घेऊन पूर्णपणे िरकाम्या कराव्या लागतील. कारण अागीची धग कापसात राहिल्यास हवेमुळे पुन्हा कापूस पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण कापूस बाहेर काढून ताे काेरडा केल्यानंतरच पुन्हा काम सुरू करण्यात येणार अाहे. त्यासाठी िकमान दहा िदवस लागण्याची शक्यता असल्याने या काळात काम बंद ठेवावे लागेल. 
- पवनकुमारअग्रवाल, संचालक, िमल 

खड्यांमुळे अाग लागल्याचा संशय... 
शेतकऱ्यांकडूनकापूस खरेदी केल्यानंतर ताे प्रथम एका यंत्रातून काढण्यात येताे. त्या ठिकाणी माेठ्या लाेखंडी पात्याद्वारे कापूस दूर फेकला जाऊन त्यात असलेली माती, दगड खाली पडतात. ते दुसरीकडून बाजूला फेकण्यात येते. मात्र, तरीही कापसामध्ये बारीक खडी, माती असते. प्राेसेस करताना मातीचे कण यंत्रात घासले जाऊन त्यातून अाग तयार हाेऊ शकते. असे प्रकार घडतात. बारीक ठिणगीनेही कापूस पेटत असल्याने अाग लागल्याची शक्यता अाहे. 

८०० गाठी, कच्चा माल 
खासगीमालकीची िजनिंग असल्याने शेतकऱ्यांकडून माेठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करून ताे मिलच्या परिसरात, गाेदामात ठेवण्यात अाला हाेता. त्यावर प्रक्रिया करून अाठशे गाठी तयार करण्यात अाल्या हाेत्या. त्या खाेल्यांमध्ये भरून ठेवल्या हाेत्या. तसेच याच िठकाणी प्रक्रियेसाठी असलेला कच्चा माल (रुई)ही हाेता. २० ते २५ फूट उंचीच्या या खाेल्यांमध्ये छतापर्यंत कापूस होता. 
बातम्या आणखी आहेत...