आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: बोदवडच्या जिनिंगमधील आग; सव्वा कोटीचा फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- बोदवड येथील मॉँ वैष्णवी जिनिंगमधील कापसाला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. या घटनेत एकूण ४,२०० क्विंटल कापूस जळाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे एक कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कपाशीतून सरकी वेगळी करत असताना मशीनमध्ये गारगोटी आल्याने ठिणगी उडाली. त्यामुळे आग लागल्याचे स्पष्ट झाले. पाच अग्नीशमन बंब आणि शहरातील १० खासगी टँकरद्वारे चार तासात आग विझवण्यात आली. याप्ररकरणी अनुप हजारी (रा.बोदवड) यांनी दिलेल्या माहितीवरून बोदवड पोलिसात आगीची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक सी.डी.बनगर पुढील तपास करत आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...