आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्टसर्किटमुळे फुले मार्केटमध्ये बुटांच्या दुकानाला लागली आग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - फुलेमार्केटमधील बुटांच्या दुकानाला गुरुवारी रात्री १० वाजता आग लागली. यात हजारो रूपयांचा माल जळून खाक झाला. दोन अग्निशामक बंबानी आग आटोक्यात आणली. 
सिंधी कॉलनी येथे राहणाऱ्या ताराचंद बागवाणी यांच्या मालकीचे ‘नवरंग शुज एजन्सी’ हे दुकान आहे. ते गुरुवारी रात्री ९.१५ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते.
 
त्यानंतर रात्री १० वाजता दुकानाला अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरातील नागरिकांनी अग्निशामक विभागास फोन करून माहिती दिली. काही मिनीटातच बंब दाखल झाला. दुकानातून धुराचे लोळ बाहेर येत होते. त्यामुळे आगीचे मुळ कळत नव्हते. 

सुरुवातीला वरच्या बाजूने पाणी मारण्यात आले. काही वेळाने दुकानाचे दोन्ही दरवाजे खुले करून पाणी मारून आग आटोक्यात आणली. अग्निशामक विभागाच्या दोन बंबानी आग पूर्णपणे विझवली. आगग्रस्त दुकानाच्या शेजारी दोन्ही दुकानांमध्ये देखील आग पसरण्याची भिती असल्यामुळे रात्री १०.४५ वाजता शेजारच्या दुकानदारांना बोलावले होते. त्यांनी दुकान उघडून खात्री केली. पोलिस उप अधीक्षक सचिन सांगळे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी घटनास्थळी बघ्यांची गर्दी पांगवली. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते. 
 
बातम्या आणखी आहेत...