आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात भीषण आग; कालिंकामाता मंदिराजवळ तीन दुकाने खाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राष्ट्रीय महामार्गावरील कालिंकामाता मंदिराजवळील हॉटेल साईप्रसादजवळील गॅरेजला रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत तीन दुकाने खाक झाली. यात अंदाजे एक ते दीड लाखांचे नुकसान झाले आहे. ही तिन्ही दुकाने वाहनांना कलर काम करणारी होती.

कालिंकामाता मंदिर परिसरात हॉटेल साईप्रसाद आहे. त्याच्या शेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये अजिंठा गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये चारचाकी वाहनांना रंगकाम केले जाते. शफी बंगाली यांच्या मालकीच्या अजिंठा गॅरेजमध्ये वीजपुरवठा पुरविणारी सर्व्हिस वायर शनिवारी रात्री एका लक्झरी बसने तोडली होती. ही वायर रविवारी दुपारी जोडल्यानंतर काही वेळातच अजिंठा गॅरेजमध्ये शॉर्टसर्किट झाले. काही क्षणात आगीने उग्र रूप धारण केल्याने रॉयल मोटर्स या गॅरेजनेदेखील पेट घेतला. त्यानंतर सेजवाण अण्णा यांच्या गॅरेजनेदेखील पेट घेतला. या तिन्ही गॅरेजमध्ये व्हॅक्युम सिलिंडर होते. गॅरेजमध्ये एक कारही उभी होती. त्या कारनेदेखील पेट घेतला. अग्निशामक विभागाच्या बंबांना तातडीने पाचारण करण्यात आले. चार बंबांच्या सहाय्याने आग विझविण्यात आली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.