आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाॅर्ट सर्किट झाल्यानेे किराणा दुकानास अाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूण परिसरातील गणेशपुरीमधील किराणा दुकानाला शनिवारी सायंकाळी शाॅर्टसर्किटमुळे अाग लागली. या अागीत जवळपास साडेतीन लाखांचा माल खाक झाला अाहे. दुकानात काम करणाऱ्या मुलास अाग अागल्याचे लक्षात अाल्यामुळे सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.
गणेशपुरीत जयेश संजय लढ्ढा यांच्या मालकीचे गणेश प्राेव्हिजन नावाचे किराणा दुकान अाहे. शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास दुकानात काम करणारा सागर नावाचा मुलगा वरच्या मजल्यावर माल घेण्यासाठी गेला. त्या वेळी त्याला भिंतीवरील इलेक्ट्रीक फिटिंगच्या प्लास्टिक पट्टीत शाॅर्टसर्किटमुळे अाग लागल्याचे दिसले. तर अागीमुळे प्लास्टिकची पट्टी वितळून खाली पडलेल्या खाेक्यांवर पडल्यामुळे तेथेही अाग भडकण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सागरने अारडा-अाेरड केली. त्याचवेळी दुकानात रेखा संजय लढ्ढा, त्यांची मुलगी पूनम संजय लढ्ढा अाणि काम करणारी महिला वंदना घुले हे काम करत हाेते. सागरने केलेल्या अारडाअाेरडनंतर ते दुकानातून बाहेर पळाले. त्यानंतर बाजूला राहणाऱ्या काफिल खान, इम्रान शेख, नजीरशेख, शरीफ शेख यांनी अाग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताेपर्यंत अागीने राैद्ररूप धारण केले हाेते. त्यानंतर घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवण्यात अाली. अर्ध्या तासानंतर गाेलाणी, महाबळ अाणि एमअायडीसीतील प्रत्येकी एक अग्निशमन बंब घटनास्थळावर पाेहाेचला. अग्निशमन विभागाचे कर्मचारी शशिकांत बारी, सुनील माेरे, प्रकाश साेनवणे, अश्वजित गर्दे, भगवान जाधव, गंगाधर काेळी, राजमल पाटील, संजय काेळी, नारायण चंदेलकर, जाेसेफ यांच्या एक तासाच्या प्रयत्नानंतर अाग अाटाेक्यात अाली.

अाठ महिन्यांत दुसरा अाघात : गणेशप्राेव्हिजनला सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास शाॅर्टसर्किटमुळे लागलेली अाग छताचे पत्रे फाेडून अात पाणी मारून अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एका तासाच्या प्रयत्नानंतर अाटाेक्यात अाणली. दरम्यान, गणेश प्राेव्हिजनचे मालक जयेश लढ्ढा यांचे वडील संजय लढ्ढा यांचे अाठ महिन्यांपूर्वी निधन झाले. त्या धक्क्यातून सावरत नाही तेवढ्यात शनिवारी दुकानात अाग लागली.

बातम्या आणखी आहेत...