आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरवस्तीत आगीने तारांबळ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - दुस-यामजल्यावरील आगीचे लोळ धूर वाढत असताना पोलिसांनी जीव धोक्यात घालून आग लागलेल्या इमारतीच्या गच्चीवरून दोन बालके महिलांना सुरक्षित बाहेर काढले. एवढेच नव्हे तर तप्त काळेठिक्कर पडलेले गॅस सिलिंडर इतर ज्वलनशील पदार्थही पोलिसांनी बाहेर काढून फेकले. नगरपट्टी परिसरात अनेक नागरिकांनी आगीची ही घटना आणि पोलिस निरीक्षक रमेशसिंग परदेशी त्यांच्या पथकाचे बचावकार्य अगदी जवळून पाहिले. घटनेबद्दल उशिरापर्यंत पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते.

नगरपट्टीवर दिलीप खिवसरा यांची इमारत आहे. इमारतीच्या खालील मजल्यावर खिवसरा यांचे व्यावसायिक कामे चालतात. सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे कामे सुरू होती. अशा वेळी दुस-या मजल्यावरील खोलीतून धूर आग िनघत असल्याचे दिसून आले. इतरांनी नियंत्रण मिळवण्यापूर्वीच आगीचे स्वरूप वाढले. यानंतर पोलिस महापािलका प्रशासनाला कळवण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, आझादनगरचे पोलिस निरीक्षक रमेशसिंग परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक राहुल गावडे यांच्यासह सुमारे २५ ते ३० पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोवर परिसरातील नागरिकांची गर्दी बचावकार्य सुरू झाले होते. दरम्यान, एकीकडे आग रौद्ररूप धारण करत असताना खिवसरा यांची पत्नी शोभा, मुलगी डॉ. तृप्ती गादिया, चार वर्षांचा नातू संभव गादिया डॉ. गादिया यांचे अवघ्या महिनाभराचे बाळही होते. खोलीत आग धूर पसरला असल्यामुळे त्यांना खाली उतरणे कठीण झाले होते. शिवाय भीतीपोटी या महिलेची रडारड सुरू झाली होती. दरम्यानच्या काळात अग्निशामक दलाचे बंबही दखल झाले. कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यात गुंतले होते. गच्चीवर अडकलेल्या कुटुंबीयांसाठी पोलिस खिवसरा यांच्या घराशेजारी असलेल्या इमारतीला शिडी लावून वर चढले. सर्वप्रथम सुरक्षेला प्राधान्य देत पोलिस कर्मचा-यांनी तप्त झालेले दोन सिलिंडर खिवसरा यांच्या गॅलरीतून शेजारच्या इमारतीत पाठविले. तर दुसरीकडे निरीक्षक रमेशसिंग परदेशी, हेडकॉन्स्टेबल भीमराव बोरसे, सईद शेख, रवींद्र पावरा यांनी गच्चीवर जाऊन महिला बालकांना शेजारच्या इमारतीवाटे सुरक्षित ठिकाणी नेले.

दरम्यान, खिवसरा यांच्या घरात असलेल्या पेपरच्या अनेक गठ्ठ्यांमुळे या आगीचे स्वरूप वाढू पाहत होते; परंतु नागरिक, पोलिस अग्निशामक दलाच्या मदतीमुुळे अप्रिय घटना टळली. उशिरापर्यंत आझादनगर पोलिस ठाण्यात अग्निउपद्रवाची नोंद करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

नगरपट्टीत लागलेल्या अागीत खाक झालेले पेपरचे गठ्ठे तसेच नागरिकांनी केलेली गर्दी.

पोलिसांच्या हाताला चटके
गरमझालेले सिलिंडर सुरक्षितपणे दुसरीकडे नेताना पोलिसांच्या हाताला चटके लागले. नागरिकांनीही हा सर्व प्रकार पाहिले. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी आलेल्या काही नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी दूर केले. तर दुसरीकडे वाहतूक वळवण्यात आल्यामुळे काहीशी कोंडी झाली होती.

अग्निशामक प्रश्न ऐरणीवर
आगीचेकळताच अग्निशामक दलाचे चार बंब कर्मचारी गांभीर्याने घटनास्थळी दाखल झाले; परंतु नेहमीप्रमाणे या वेळीही कर्मचा-यांकडे फायरसूट आवश्यक उपकरणांचा तुटवडा जाणवला. अशा परिस्थितीत हे कर्मचारी कामात व्यग्र होते. त्यामुळे या विभागातील कर्मचा-यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एेरणीवर आला आहे.