आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिलिंडरने घेतला अचानक पेट; तरुणाचे हात भाजले, घरातील 10 हजारांचे साहित्य खाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- हरिविठ्ठलनगरात अशोक शिरसाट यांच्या घरात शुक्रवारी सकाळी वाजेच्या सुमारास सिलिंडरने अचानक पेट घेतला. त्यांच्या पत्नी चहा करीत असताना हा प्रकार घडला. मात्र, सुदैवाने सिलिंडरजवळ कोणीही उभे नसल्याने माेठा अनर्थ टळला. मात्र, अाग विझवताना त्यांच्या मुलाचे दाेन्ही हात भाजले गेले. दरम्यान, गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी सिलिंडर तपासून दिले नसल्याचा आरोप शिरसाठ यांनी केला आहे.
सिलिंडरचा उडाला भडका
महाबळयेथील भूषण गॅस एजन्सीत ४११६५ क्रमांकाचे कनेक्शन अशाेक िशरसाट यांच्या नावाने अाहे. फेब्रुवारीला एजन्सीने िशरसाट यांच्याकडे सिलिंडरची िडलिव्हरी केली हाेती. त्यानंतर त्यांनी गुरुवारी दुपारी १२.३० वाजता िसलिंडर लावले. शुक्रवारी सकाळी िशरसाट यांच्या पत्नी लीलाबाई शिरसाट (वय ४५) या गॅसवर चहा ठेऊन बाहेर गेल्या. काही मिनिटांतच रेग्युलेटरजवळ भडका झाला. त्यांचा मुलगा सागर िशरसाट (वय २७) कसला आवाज आला? ते बघण्यासाठी स्वयंपाक घरात गेला. त्या वेळी िसलिंडरने पेट घेतल्याचे त्याला िदसले. त्याने अाग िवझवण्याचा प्रयत्न केला. १५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर अाग िवझली. मात्र, ताेपर्यंत घरातील िमक्सर, तेलाची कॅन, वायरिंग अािण कपडे, असे सुमारे १० हजार रुपयांचे सािहत्य खाक झाले होते.
सुदैवाने अनर्थ टळला
िशरसाटयांच्या घरात िसलिंडरने पेट घेतला तेव्हा सुदैवाने गॅसजवळ काेणीही उभे नव्हते. लीलाबाई ह्या चहा ठेऊन बाहेर कामासाठी िनघून गेल्या. त्यांच्या मुलीचे दाेन्ही मुले त्यांच्याच जवळ राहतात. सुदैवाने त्या वेळी स्वप्निल दीपक लाेहार (वय ७) हा शाळेत तर त्याचा लहान भाऊ िवघ्नेश (वय ३) हा बाहेर खेळत हाेता. मात्र, या दुर्घटनेत अाग िवझवण्यासाठी गेलेल्या सागर याचे दाेन्ही हात भाजले गेले.
दुर्घटना टाळण्यासाठी काय करावे?
काम संपल्यानंतर लगेचच िसलिंडरच्या रेग्युलेटरचे बटण बंद करावे.
रबराची नळी दर पाच वर्षांनी बदलावी.
सिलिंडर कर्मचाऱ्याकडून तपासूनच घ्यावे.
घरात गॅसचा वास येत असेल तर इलेक्ट्रिकचे काेणतेही बटण दाबू नये.
घराचे दारे, िखडक्या उघडाव्या.
सिलिंडरजवळ ज्वलनशील वस्तू ठेवू नयेे.

तपासले नव्हते
एजन्सीच्या कर्मचा-यांनी तारखेला िसलिंडर िदले. मात्र, ते तपासून िदले नव्हते. त्यामुळे हा प्रकार घडला अाहे. सुदैवाने त्या िठकाणी काेणी नव्हते; नाहीतर अनर्थ घडला असता. सागरिशरसाट, हरिविठ्ठलनगर
नळी जुनी झाली
शिरसाटयांच्या गॅस िसलिंडरच्या रबराची नळी जुनी झाली हाेती. त्याच्यातून गॅस लीक झाल्याने पेट घेतला. िसलिंडर अािण रेग्युलेटरमध्ये काेणताच िबघाड नव्हता. भूषणचाैधरी, संचालक, भूषण गॅस एजन्सी सिलिंडरने पेट घेतल्याने अस्ताव्यस्त पडलेले साहित्य.