आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोप उडवणारा आवाज कशाचा? उल्कापाताच्या चर्चेला शहरात उधाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहर परिसरात बुधवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे मेहरूण तलावाकाठी फटाक्यांच्या गाेदामावर वीज कोसळताच प्रचंड स्फोटाने मेहरूण तलाव, मोहाडी राेड परिसर हादरला. मध्यरात्री झालेल्या प्रचंड आवाजाने भयभीत झालेल्या नागरिकांनी तलावाकडे नजर टाकली असता, टेकड्यांच्यामध्ये प्रचंड ज्वाला दृष्टिक्षेपात पडत हाेत्या. भर पावसात नजरेस पडणाऱ्या ज्वाला पाहून उल्कापात झाल्याचा अनेकांना संशय अाला.
मेहरूण तलावाच्या काठी विजांच्या कडकडाटांसह मोठ्या स्फाेटाचा अावाज झाल्याने परिसरातील काही नागरिक भर पावसातही घराबाहेर निघाले. या वेळी वरून पाऊस सुरू असताना मेहरूण तलावाकाठी मोठ्या ज्वाला निघताना नजरेस पडल्या. त्यामुळे या ठिकाणी उल्कापात झाल्याचा संशय अनेकांना अाला. जी मंडळी जागली हाेती त्यांनी परिसरातील नागरिकांना, मित्र मंडळींना याची माहिती देत मेहरूण तलाव परिसरात उल्कापात झाल्याची वार्ता पाेहोचली.
उजाडल्यावर प्रत्यक्षदर्शींना झाला उलगडा
रात्रीउल्कापाताचे वृत्त आणि डोळ्यांनी लख्ख प्रकाश पाहिलेल्या अनेकांनी गुरुवारी दिवसभर तलावाकाठी कुतूहलापाेटी हजेरी लावली. तेव्हा उल्कापात नव्हे तर जळालेले फटाक्यांचे गोदाम नजरेस पडले.
२५ लाखांच्या स्फोटकांची आतषबाजी
अग्निशमनअधिकारी वसंत कोळी यांनी श्यामा फायरला नोटीस बजावली. गोदामात १० ते १२ हजार किलो वजनाचे सुमारे २५ लाख रुपये किमतीची स्फाेटके होती.

भर पावसात ६० फूट उंच ज्वाला
मेहरूणतलावाकाठी कृष्णा लॉनच्यापुढे असलेल्या टेकड्यांवर अद्याप नागरी वस्ती झालेली नाही. त्यात भर पावसात लांबून टेकडीवर मोठ्याप्रमाणात सुमारे ५० ते ६० फुटांवर ज्वाला निघत असल्याने लख्ख प्रकाशामुळे हा भलताच प्रकार असल्याची धारणा परिसरातील नागरिकांची झाली होती.