आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानांची तपासणी केल्यानंतरच फटाके विक्रीसाठी ‘एनओसी’ देणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नागरी वस्तीतील फटाक्यांच्या गाेदामाला अाग लागून हाेणारी हानी टाळण्यासाठी अाता शासनाने परवानगी देण्याचा विचार केला अाहे. महापालिकेने यंदापासून जुन्या विक्रेत्यांसंदर्भात हरकत घेण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यासोबत नवीन विक्रेत्यांना परवानगी देण्याचा देखील निर्णय घेतला अाहे. यासंदर्भात मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे शुक्रवारपासून दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर दुकानदारांना ‘ना-हरकत’ दाखला दिला जाणार आहे.
तीन वर्षांपूर्वी जळगाव शहरातील राजकमल टाॅकीजजवळ फटाक्यांच्या गाेदामाला अाग लागून माेठी दुर्घटना घडली हाेती. त्यानंतर नाशिक येथेही असा प्रकार घडला हाेता. तर फटाके विक्रीच्या मुद्द्यावरून याचिका दाखल हाेती. त्यात न्यायालयाने नागरी वस्तीत फटाके विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला अाहे. यासंदर्भातील अादेश मनपाला प्राप्त झाला नसला तरी अग्निशमन विभागाच्यावतीने काळजी घेतली जात अाहे.

फटाक्यांच्या प्रदूषणाबाबत भूमिका ठरणार
^दिवाळीमध्ये फटाक्यांपासून हाेणाऱ्या प्रदूषणाबाबत न्यायालयाने सरकारला सक्त सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत विविध उपाययोजना करण्यासाठी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली अाहे. अशोक करे, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
बातम्या आणखी आहेत...