आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध असूनही सांभाळताहेत जिल्ह्याचा कारभार : देशातील पहिले अंध आयएएस अधिकारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयएएस अधिकारी कृष्णगोपाल तिवारी - Divya Marathi
आयएएस अधिकारी कृष्णगोपाल तिवारी
जळगाव- आई-वडिलांचीकेवळ दोन एकर शेती. त्यामुळे घरची परिस्थिती गरिबीची. त्यातही तीन भावांना वयाच्या दहाव्या वर्षापासून दृष्टी कमी होण्याचा आजार जडला. पदवीचे शिक्षण घेत असताना पूर्णपणे दृष्टी गेली. असे असतानाही प्रचंड मेहनत केली. दोन वेळा यूपीएससीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर तिसऱ्यांदा मात्र लक्ष्य गाठले.
आता पूर्णपणे अंध असून, मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून यशस्वीपणे काम पाहत आहेत. ही प्रेरणादायी कहाणी आहे मूळचे उत्तर प्रदेश येथील तथा देशातील पहिले अंध आयएएस अधिकारी कृष्णगोपाल तिवारी यांची. शहरातील अंध अपंग विद्यार्थ्यांसाठी निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या कार्यक्रमासाठी तिवारी हे रविवारी जळगावात आले होते. त्या वेळी त्यांच्याशी साधलेल्या संवादातून त्यांच्या खडतर प्रेरणादायी प्रवासाबाबत माहिती मिळाली. एखादी अंध व्यक्ती जिल्हाधिकारीपदापर्यंत पोहाेचू शकते, ही कल्पनाही कोणी करणार नाही. मात्र, तिवारी यांनी प्रचंड मेहनत जिद्दीने हे ध्येय गाठून दाखवले आहे. देशभरातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या लाखो मुलांसाठी तिवारी यांची कहाणी अत्यंत प्रेरणादायी ठरणारी आहे.

अशी आहे कामाची पद्धत
अंधव्यक्तींनी संगणक कसे हाताळावे, कामे कशी करावीत यासाठी डेहराडून येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हिज्युअली हॅण्डीकॅप’ या संस्थेतून मी विशेष प्रशिक्षण घेतले. आता आवाजाच्या माध्यमातून ते संगणकावर काम करतात. त्यांना दोन सहायक दिलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून लिहिण्याचेही काम हाेते. परीक्षा देत असताना आकृती काढण्यासाठी त्यांनी अॅल्युमिनीअमच्या तारांचा वापर करून भिंतीवर आकृती उमटवून प्रात्यक्षिक करून दाखवले होते. आता दैनंदिन कामात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
पुढील स्‍लाईडवर वाचा कसे गाठल्‍ेा ध्‍येय.....
बातम्या आणखी आहेत...