आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • First Time 85 Feet High Dahihandi In Jalgaon City

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव शहरात पहिल्यांदाच 85 फूट दहीहंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - युवाशक्ती फाउंडेशनतर्फे यंदा शहरात प्रथमच 85 फूट उंच दहीहंडीचे आयोजन 29 रोजी काव्यरत्नावली चौकात करण्यात आले आहे. पुणे, मुंबईसह मोठ्या शहरात होणा-या दहीहंडीचा कार्यक्रम प्रत्यक्ष नागरिकांना पाहण्यास मिळणार आहे. एवढेच नव्हे तर दहीहंडी फोडणा-या पथकाला सव्वा लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे, असे युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया यांनी सांगितले.


युवतींसाठी 35 फुटाची दहीहंडी आयोजित केली आहे. यावेळी अमळनेर येथील सिद्धार्थ व्यायामशाळेचे 150 जणांचे ढोल ताशाचे पथक तर विवेकानंद शाळेतील लेझीम पथक सहभागी होणार आहे.


सिंगल क्रेनच्या सहाय्याने उभारणार दहिहंडी
सिंगल क्रेनच्या साहाय्याने ही दहीहंडी उभारण्यात येणार असून ती फोडण्यासाठी जवळपास 11 थर लागतील. दहीहंडी फोडणा-यांना सव्वालाख तर काठीच्या साह्याने हंडी फोडणा-यांना 15 हजार बक्षीस देण्यात येणार आहे. मायटी ब्रदर्सतर्फे ट्रकच्या साहाय्याने लाइटींग उपलब्ध करून देण्यात आली असून चित्रपटातील 48 बाय 16 चा हायटेक लाइट स्टेज पाहायला मिळेल. तसेच 28 व 29 ऑगस्ट रोजी रॅलीदेखील काढण्यात येणार असून फाउंडेशनतर्फे शहरातील प्रमुख रस्त्यांवर कुमुद नारखेडे रांगोळी काढतील.


सुरक्षिततेसाठी मुंबई येथून 10 बाउन्सर येणार
काव्यरत्नावली चौकात उत्सवाच्या प्रसंगी काही अनुचित प्रकार घडू नये. आनंदाने उत्सव साजरा करण्यात यावा म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईहून 10 बाउन्सर मागविण्यात येणार आहेत.