आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खान्देशात पाच प्राध्यापक बोगस पीएच.डी.धारक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत असलेल्या पाच प्राध्यापकांची पीएच.डी. (विद्यावाचस्पती पदवी) बोगस असल्याचा आरोप अधिसभा सदस्य अ‍ॅड.अमित दुसाने यांनी केला असून, यासंदर्भात त्यांनी विद्यापीठाकडे तक्रार केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगा (यूजीसी)ने नुकतीच राज्यातील सर्व पीएच.डी.प्राप्त प्राध्यापकांची माहिती मागितली होती. काही प्राध्यापकांनी यूजीसीशी संलग्न नसलेल्या विद्यापीठांतून पीएच.डी. मिळवल्याचे उघड झाल्यामुळे ही माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानेही याबाबत चौकशीला सुरुवात केली; परंतु विद्यापीठास एकही बोगस पीएच.डी.प्राप्त प्राध्यापक आढळून आला नाही.

दरम्यान, विद्यापीठ कार्यक्षेत्राच्या शिरपूर येथील एच.आर.पटेल महिला महाविद्यालयातील प्रा.हेमंत मगन चौधरी, शिंदखेडा येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयील प्रा.तुषार मल्हारराव पाटील, धडगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रा.दिनेश विक्रम पाटील, शिरपूर येथील आर.सी.पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा.योगिनी पद्माकर धाकड आणि शिंदखेडाचे एसएसव्हीपीएसचे प्रा.अशोक त्र्यंबक अहिरे यांची पीएच.डी. पदवी बोगस असल्याची तक्रार अ‍ॅड.दुसाने यांनी केली आहे. तसेच संबंधित प्राध्यापकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

बोगस पीएच.डी. पदवी घेणार्‍या पाचही प्राध्यापकांनी राजस्थानमधील जेजेटीयू या विद्यापीठातून पीएच.डी. घेतली आहे. तसेच या प्राध्यापकांसह अन्य काही प्राध्यापकांच्या पदवीसंदर्भातही अ‍ॅड.दुसाने यांनी संशय व्यक्त केला आहे.