आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दिवसांच्या आठवड्यामुळे सहा महिनेच सुरू राहणार शाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्राथमिक माध्यमिक शाळांना शनिवार रविवारची सुटी देण्याबाबत शासकीयस्तरावरून खल सुरू आहे. शाळांनी आरटीई कायद्यानुसार अध्यापनाच्या तासिका पूर्ण करण्याची तयारी दर्शवल्यास पाच दिवसांच्या कामकाजाची परवानगी दिली जाईल, अशा सूचना मुंबई विभागीय शिक्षण संचालकांना दिल्या आहेत. या दृष्टीने शिक्षकांनी शाळेचे संभाव्य वेळापत्रकही तयार केले आहे. त्यामुळे वर्षाच्या ३६५ दिवसांतून केवळ २०१ दिवस म्हणजे महिने २१ दिवसच शाळा सुरू राहणार असून १६४ दिवस सुट्या मिळणार आहेत. त्यामुळेच शाळा सूरू होण्याआधी तसेच अद्याप कोणत्याही सूचना नसतानाही शिक्षकांमध्ये ‘फाइव्ह डे वीक’ बद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

शिक्षकांकडून फाइव्ह डे वीकला प्रतिसाद िमळत असला तरी, पालकांमधून यास विरोध दर्शवला जात आहे. सलग सुट्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची वृत्ती कमी होऊन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती पालकांमधून व्यक्त होत आहे. मात्र, शिक्षकांचा उत्साह अधिक दिसून येत आहे. यादृष्टीने शिक्षकांनी तयारीही सुरू केली आहे. यासाठीचे वेळापत्रक तयार करण्यासह सुट्यांचे नियोजनही शिक्षकांमध्ये सुरू आहे. काही सुज्ञ उत्साही शिक्षकांकडून तयार झालेले वेळापत्रक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सर्वत्र पसरत असल्याने पाच दिवसांच्या आठवड्याची चर्चा जोर धरत आहे.

सात तासांची शाळा
शिक्षकांनीतयार केलेल्या वेळापत्रकात तासिकांऐवजी १० तासिका ठेवण्यात आल्या आहेत. ४५ मिनिटांची तासिका ही नव्या वेळापत्रकानुसार ३० मिनिटांची केली आहे. दोन १० मिनिटांची छोटी सुटी ५० मिनिटांची मोठी सुटी ठेवली आहे. यासह शाळेची वेळ ही सकाळी १०.१५ ते सायंकाळी वाजेपर्यंत ठेवली आहे. शासनाने पाच दिवसांच्या आठवड्याचा निर्णय घेतल्यास या संभाव्य वेळापत्रकाच्या आधारे सर्वच शाळांमध्ये वेळापत्रक केले जाणार आहे. सहा दिवसांच्या शाळेत शाळेची वेळ ही सहा तासांची होती. ती सात तासांची होईल.

अशा असतील दररोजच्या तासिका
परिपाठ १०.१५ते १०.४५
पहिला तास १०.४५ते ११.२०
दुसरा तास ११.२०ते ११.५०
छोटी सुटी ११.५०ते १२.००
तिसरा तास १२ते १२.३०
चौथा तास १२.३०ते १.००
पाचवा तास १.००ते १.३०
मोठी सुटी १.३०ते २.२०
सहावा तास २.२०ते २.५०
सातवा तास २.५०ते ३.२०
आठवा तास ३.२०ते ३.५०
छोटी सुटी ३.५०ते ४.००
नववा तास ४.००ते ४.३०
दहावा तास ४.३०ते ५.००