आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूरजवळ अपघातात पाच ठार; निमगूळला सामूहिक अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर - गुजरातमधून उपचार घेऊन परतणाऱ्या कुटुंबीयांच्या कार भरधाव ट्रकची समाेरासमाेर धडक हाेऊन पाच जण जागीच ठार झाले. धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील जामकी शिवारातील बेलदारा फाट्याजवळ सोमवारी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ गावचे असून त्यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश अाहे.
निमगूळ येथील बागल कुटुंबीय सोमवारी पहाटे गुजरात राज्यातील वलसाड- चिखली येथील वैद्याकडे सांधा, पाय, पाठ कंबरदुखीवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचारासाठी गेले होते. उपचार झाल्यानंतर ते सोमवारी दुपारी मारुती कारने (एमएच-१८-डब्ल्यू-९२४३) वलसाड-चिखली येथून सुरत येथे गेले हाेते. तेथील रुग्णालयात दाखल नारायण बागल (५४, ह.मु. सोनगड, जि.तापी, गुजरात) यांच्या प्रकृतीची विचारपूस करून सायंकाळी सहाच्या सुमारास ते परत निघाले. रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास बेलदारा फाट्याजवळ सुरतकडे जाणाऱ्या ट्रकची बागल यांच्या कारची धडक झाली. अपघात इतका भीषण हाेता की मारुती कार ट्रकने सुमारे २०-२५ फूट फरपटत नेली. त्यामुळे कारच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, फोटोसह अधिक माहिती..