आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडीच्या तयारीतील 5 जणांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो केवळ सादरणीकरणासाठी)
जळगाव शहरातील वाढत्या घरफोड्या, सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी नेमलेल्या पथकाने गुरुवारी जे.के. पार्कमधील हुले मलंग दर्ग्यात लपलेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चाकू, लोखंडी रॉड, लाल मिरची पावडरची पुडी असे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जे.के. पार्कमधील हुले मलंग दर्गा येथे शेख हमीद शेख समशोद्दीन (वय ३६), इब्राहीम इस्माईल तडवी (वय ३०), शेख मुज्जमिल शेख शब्बीर (वय २३), मोहंमद रिजवान इब्राहीम (वय २४)(चौघे रा. भुसावळ) सुरत येथील शेख उस्मान शेख गनी (वय १९) या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या पथकातील उपनिरीक्षक नीता मांडवे, सहायक फौजदार नुरोद्दीन शेख, हेडकॉन्स्टेबल बापुराव भोसले, संजय पाटील, शरद भालेराव, महेश पाटील यांच्या पथकाने अटक केली
बातम्या आणखी आहेत...