आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत \'आसना\'चा तांडव, विदर्भात चौघांचा तर जळगावात बालिकेचा मृत्‍यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिवृष्‍टीमुळे नांदेड जिल्‍ह्यातील सहस्रकुंड धबधबा असा ओसंडून वाहत आहे. - Divya Marathi
अतिवृष्‍टीमुळे नांदेड जिल्‍ह्यातील सहस्रकुंड धबधबा असा ओसंडून वाहत आहे.
मुंबई- - दमदार पावसाची वाट पाहणाऱ्या महाराष्‍ट्रातील बहुतांश भागात मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्‍ह्यातील चाेपडा तालुक्यात बुधवारी पहाटे वरुणराजा अगदी ‘छप्पर फाड के’ बरसला. यात एका चिमुलीचा पाण्‍यात बुडल्‍याने करुण अंत झाला तर अमरावती विभागात वीज पडल्‍याने चौघांना आपले प्राण गवमावे लागले. दरम्‍यान, गुरुवारी नांदेड-हिंगोली जिल्‍ह्यातील आसना नदीने आपले सोडले. त्‍यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, वसमत तालुक्‍यातील पंप हाउसमध्‍ये पाच कर्मचारी अडकले आहेत.
वसमत तालुक्यातील आभाळ फाटले
हिंगोली जिल्‍ह्यातील वसमत तालुक्‍यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. दरम्‍यान,ख आसना नदीला पूर आला. त्‍यामुळे दोन हजार हेक्टर वरील पेरणी धोक्‍यात आली.

तलाव दाेन तासांत भरला
चाैगावपरिसरात रात्री एक वाजेपासून रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. मात्र, पहाटे वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडल्याने सर्व नाले भरून वाहिले. कोरडाठाक पडलेला पाझर तलाव पहाटे पाच वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या दोन तासात भरला. सांडव्याचे पाणी नाल्यामधून गावात शिरले. यात ताईबाई खुमानसिंग पारधी या महिलेच्या घराचे नुकसान झाले. बाळू ग्यानू पाटील यांच्या घरात पाणी शिरले. त्यांच्या घरातील कांद्याच्या ५० गोणी पाण्यात तरंगत होत्या. शांताराम विक्रम कोळी यांच्या मातीच्या घराची भिंत पडून पाणी शिरले. जीवन लखा भील यांचे ५० टक्के शेत वाहून गेल्याने पिकाचे फार मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. विश्राम सुकदेव धनगर यांच्या शेतावरील कापूस मिरची पिकाचे नुकसान झाले. जिल्हा परिषद शाळेतही पाणी तुंबले आहे.

तालुक्यातील पाऊस (सर्व अाकडे मिलिमीटरमध्ये)
लासूर१९९
चोपडा १९६
अडावद ६२
धानोरा ३७
गोरगावले ६८
चहार्डी १८५
हातेड १७९
या गावांना बसला सर्वाधिक फटका
वसमत तालुक्‍यातील कुरुंदा, आंबा, सेलू या गावांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला. पाणी गावात शिरल्यामुळे नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला आहे. कुरुंदा गावाला तर तलावाचे स्‍वरुप आले. नजर जाईल तिकडे पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यात 10 ते 15 घरांची पडझड झाली आहे. अनेकांनी घराच्या गच्चीवर जाऊन आश्रय घेतला. पुरामुळे लाखो रूपयांचे नुकसान झालं आहे.
शेतात अनेक जण अडकून पडले
या पुराच्या पाण्यामुळे दिवसा शेतात काम करण्यासाठी गेलेले काही जण शेतातच अडकून पडले आहेत. अचानक आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या आखाड्यांवरील जनावरे वाहून गेली आहेत.

वर्धा - यवतमाळमध्येही जोरदार पाऊस
यवतमाळ आणि वर्ध्‍यामध्ये आज जोरदार पाऊस झाला. यामुळे काही काळ घोटी गावजवळच्या पुलावरून पाणी वाहत होते.

विदर्भात चौघांचा मृत्यू
अमरावती,बुलडाणा, अकोला, अकोट, यवतमाळसह घाटंजी, पांढरकवडा तालुक्यात बुधवारी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. यादरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, पांढरकवडा तालुक्यात वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. यात घाटंजी तालुक्यातील शिरोली येथील शेतकरी दांपत्य पांढरकवडा तालुक्यातील दोन मजुरांचा समावेश अाहे.

ग्रामस्थ म्हणतात... कचरा अडकल्याने अाेढावले संकट
चहार्डी (जि. जळगाव) येथे पानटपऱ्या, बैलगाड्या आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या झाडण चौकातील उभ्या असलेल्या रिक्षा अक्षरश: वाहून गेल्या होत्या. त्यात सागर गोकुळ पाटील यांची रिक्षा चक्काचूर झाली आहे. चहार्डी येथील चंपावती आणि रत्नावती नदीच्या संगमापुढे असलेल्या सिंचन विभागाने बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात कचरा अडकल्याने गावात पाणी शिरले, असे ग्रामस्थांनी सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पावसाच्‍या रौद्र अवताराचे फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...