आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाऊस लांबला; फुले महागली अन् बाजार कोमेजला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पावसाळा लांबल्यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. परिणामी फुलांचे दर गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीने वाढले आहेत. गुलाबाचा एक हार 800 ते 1000 रुपयांपर्यंत पोहोचल्याने यंदा फुलांचा सुगंधहीमहागला आहे.

लग्नसमारंभामुळे फेब्रुवारी महिन्यापासून फुलांची मागणी वाढली होती; त्यानंतर जूनच्या सुरुवातील मागणी कमी झाली. मात्र, काही लग्नतिथी बाकी असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात फुलांची खरेदी-विक्री सुरूच आहे. पाऊस आला नसल्यामुळे गुलाब, लिली, मोगरा, निशिगंधा, अस्टर या सारखी फुले भाव खात आहेत. नांदेड, भुसावळ, सुरत, अहमदनगर, पुणे, शिर्डी येथून शहरात फुले येतात. भाव वाढलेले असले तरी मागणीवर परिणाम झालेला नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. स्वागत समारंभासाठी लागणारे बुकेदेखील महाग झाले आहेत. पाऊस पडल्यानंतरच फुलांचे दर हे कमी होण्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दुपटीने वाढ
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे भावही स्थिर होते. यंदा जूनमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांकडून फुलांची आवक झालेली नाही. परिणामी परराज्यातूनही काही फुलांची आयात केली जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.
अशी झाली दरवाढ

प्रकार - आधीचे दर - सध्याचे दर
मोगरा - 200 रुपये किलो - 600 रुपये
लिली - 5 रुपये बंडल - 20 रुपये
गुलाब - 100 रुपये शेकडा - 400 रुपये
अस्टर - 25 रुपये किलो - 60 रुपये

पाऊस लांबल्याने आवक कमी
४पाऊस लांबल्यामुळे आवक कमी झाली आहे. ज्या फुलांची विशेष मागणी आहे ती महागली आहेत. लग्नसमारंभामुळे यंदा मागणी वाढली होती. पाऊस सुरू झाल्यावर भाव कमी होतील.
मंगला बारी, फूल विक्रेत्या