आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबारकरांची टोलमधून मुक्ती!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार - शहरातील उड्डाणपूल बांधकामाच्या खर्चापोटी झालेल्या खर्चाची 25 कोटींची रक्कम आदिवासी विकास विभाग टप्प्याटप्प्याने देणार असल्याने नंदुरबारकरांची लवकरच जाचक टोलमधून मुक्तता होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. आदिवासी विकास विभागातर्फे कृषी महाविद्यालय उभारण्यासाठी 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या खेळाला वाव मिळावा म्हणून आदिवासी क्रीडा प्रबोधिनी स्थापनेलाही हिरवा कंदील मिळाला आहे.
बुधवारीच आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते आणि आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीत आमदार शरद गावित, आमदार जगदीश वळवी, आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार उपस्थित होते. टोल मुक्तीचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता लवकरच होणार आहे. दरवर्षी पाच कोटींची रक्कम आदिवासी विकास महामंडळाकडून रस्ते विकास महामंडळाला देण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांत टोल नाके बंद होतील.