आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Food And Drugs Administration Take Action On Adarsh Industry

अन्न सुरक्षा विभागाची ‘आदर्श इंडस्ट्रीज’वर कारवाई, अखाद्य पावडरचा डाळ पॉलिशसाठी वापर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने औद्योगिक वसाहतील आदर्श इंडस्ट्रीजमध्ये मंगळवारी दुपारी तपासणी केली. या कारवाईत उडीद डाळीवर प्रक्रिया करताना अखाद्य पावडर लावण्यात येत असल्याच्या संशयावरून डाळीच्या 320 गोण्या तसेच पॉलिश पावडरच्या 106 गोण्या, असा एकूण 9 लाख 50 हजारांचा माल सील करण्यात आला आहे.


चारमल चंपालाल लाहोटी व इतर 5 भागीदार यांच्या मालकीच्या आदर्श इंडस्ट्रीजमध्ये डाळीवर प्रक्रिया करताना अखाद्य पॉलिश वापरली जात असल्याची गुप्त माहिती अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती. यात इंदूर येथून आलेल्या पॉलिश पावडरचा वापर डाळीसाठी केला जात होता. या पावडरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. सहाय्यक आयुक्त बी.यू. पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.