आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नसुरक्षा योजनेतील धान्य झाले गायब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - अन्नसुरक्षा योजनेतील धान्यच गायब झाल्याचा प्रकार सध्या अमळनेर तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुभवास आला आहे. गत महिन्यात गहू तांदळापासून लाभार्थी वंचित राहिले. त्यामुळे अन्नाची सुरक्षाच गायब झाल्याचे चित्र आहे.

प्रत्येक व्यक्तीला जेवणासाठी लागणा-या धान्याची हमी या योजनेंतर्गत आहे. मात्र, धान्यच वेळेवर मिळत नसल्याने या अन्नाची सुरक्षाच वा-यावर असल्याचे चित्र आहे. यापूर्वी स्वस्त धान्य दुकानातून तीन प्रकारचे धान्य वितरित व्हायचे. त्यात अंत्योदय, बी.पी.एल., ए.पी.एल. असे तीन प्रकार होते. मात्र, आता नव्या योजनेत बदल झाला आहे. व्यक्तिनिहाय धान्य वितरण या योजनेत होईल. मात्र, जून महिन्यात स्वस्त धान्य दुकानदारांनी चलन भरूनही त्यांना धान्य मिळाले नाही.

अशी होती मागणी
प्राधान्य कुटुंब
गहू : 4 हजार 567.95 क्विंटल
तांदूळ : 3 हजार 97.04 क्विंटल
अंत्योदय कुटुंंब
गहू : 1850. 50 क्विंटल
तांदूळ : 1345. 82 क्विंटल
बी.पी.एल. कुटुंब : 19, 260 क्विंटल
ए.पी.एल. : 13 हजार 005

दक्षता समित्यांची अनास्था
5 जुलै 2013 रोजी संसदेत अन्नसुरक्षा विधेयक संमत झाले. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 12 सप्टेंबर 2013 रोजी या विधेयकास मंजुरी दिली. परंतु त्याप्रमाणे माल वेळेवर मिळत नसल्याने अद्यापही संदिग्धताच आहे. दुकानांवर देख रेख करण्यासाठी गावनिहाय दक्षता समित्यांची स्थापना झालेली आहे. याबाबत समित्याही चकार शब्द काढत नसल्याचे चित्र आहे किंवा माल आला नाही, याबाबत त्यांनी तक्रारी केल्याचे चित्र दिसत नाही. जुलै महिन्यात आता अल्प प्रमाणात माल पोहचत आहे.