आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Continue Electricity Supply 90 Linemen, 20 Engineers

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ९० लाइनमन, २० अभियंते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गणरायास निरोप देण्यासाठी रविवारी काढण्यात येणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसह दिवसभरात कुठेही वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी आपली टीम सज्ज असल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ९० लाइनमन २० अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावर आठ ते दहा पॉइंट ठेवण्यात आले असून टेस्टिंग गॅग, ब्रेकडाऊन व्हॅन, फ्यूज कॉलची टीम सज्ज करण्यात आली असल्याची माहिती मुख्य अभियंता जे.एम.पारधी यांनी दिली.

गणेशोत्सवादरम्यान दहा दिवसात अनेकदा वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या. यामुळे गणेश कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. गणेश विर्सजनादरम्यान कुठेही वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी गणेशभक्तांनी प्रशासनाकडे सुरळीत वीजपुरवठ्याची मागणीही केली होती. याची महावितरण प्रशासनाने गंभीर दखल घेत रविवारी किमान विर्सजन होईपर्यत कुठेही वीजपुरवठा खंडित होणार नाही, याचे नियोजन पुर्ण केलेले आहे. यासाठी काही कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द केल्या असून वरिष्ठ अधिकारी, अभियंत्याच्याही नियुक्त्या केल्या आहेत.

विसर्जन मिरवणुकीत विजेअभावी कुठेही गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी, एस.एन.देशपांडे, एन.बी.चौधरी, यू.डी.चौधरी यांनी शनिवारी सायंकाळी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिन्या, लोंबकळणाऱ्या तारा काढण्यात आल्या. तसेच सर्व फीडरवर कर्मचारी नियुक्त करण्यासह दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. मेहरूण तलाव परिसरात दोन ठिकाणांवरून वीजपुरवठा घेण्यात आला आहे. यावरही वीजपुरवठा खंडित झाल्यास विद्युत जनित्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. मिरवणुकीदरम्यान कुठेही वीजपुरवठा खंडित झाल्यास संबंधित फीडर अभियंत्यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

वीज तास गूल झाल्याने गणेशभक्त संतप्त
शनिवारीदुपारी वाजेपासून नवीपेठ, विसनजीनगर, फुले मार्केट, केळकर मार्केट या भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी वाजेपर्यंत तो सुरळीत झाल्याने व्यावसायिक, गणेशभक्त, कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. देखाव्यांचा शेवटचा दिवस असल्याने नागरिकांची गर्दी वाढत असताना वीज नसल्याने अडथळेही आल्याच्या तक्रारी गणेश भक्तांनी केल्या.