आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेहरूण’साठी जलसंपदा विभागाकडे निधी मागणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या मेहरूण तलावाच्या संवर्धन सुशोभिकरणासाठी जलसंपदा विभागाकडून विशेष निधी मिळावा, याकरिता पाठपुरावा करण्यासाठी महासभेत ठराव पारित करण्यात येणार आहे. तसेच वॉर्डनिहाय साफसफाईचा मक्ता बंद करून एकमुस्त पद्धतीने मक्ता सुरू करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावावरही निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिकेची महासभा २९ रोजी महापौर राखी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत मेहरूण तलावाच्या सुशोभिकरणासाठी आणखी निधी मिळावा, हा विषय प्रमुख असून त्याबाबत ठराव करण्यात येणार आहे. तसेच मुक्ताई कॉलनीतील आधार ज्येष्ठ नागरिक संघाने खुला भूखंड विकसित करण्यासाठी दिलेल्या पत्रावरही निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर स्थायी समितीचे आठ सदस्य महिला, बालकल्याण समितीचे पुनर्गठण करण्यात येणार आहे.

त्याच कर्मचाऱ्यांत करा सफाई
आरोग्यविभागाने नऊ वॉर्डांत दिलेल्या ठेका पद्धतीमुळे पालिकेला ३१ लाख रुपये खर्च येतो. पूर्वीच्या एकमुस्त ठेक्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे नऊ वॉर्डांतील ठेका रद्द करावा. तसेच शहरात एकमुस्त पद्धतीने कामगार पुरवावेत, असा प्रस्ताव दिला आहे. तसेच मुख्य लेखापरीक्षकांनी महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता सध्याचा ठेका तातडीने रद्द करणे योग्य ठरेल, असे सुचवण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या ५४३ कामगारांकडूनच साफसफाईचे काम करून घ्यावे. ते काम करत नसतील तर शिस्तभंगाची कारवाई करावी. काम नाही तर दाम नाही, याचाही अवलंब करावा, असे सुचवण्यात आले आहे. ५४३ कामगारांकडून साफसफाई करताना अडचणी आल्यास एकमुस्त पद्धतीचा अवलंब करावा, असा शेरा मारला आहे.
तलावासाठी यापूर्वी एक कोटींचा निधी
मेहरूणतलावाच्या संवर्धन सुशोभिकरणासाठी यापूर्वीच कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. आणखी निधी मिळावा, यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करावा, असा प्रस्ताव भाजपच्या नगरसेविका अॅड.सुचिता अतुलसिंह हाडा यांनी सादर केला आहे. ठराव मंजूर करून जलसंपदा विभागाकडूनही निधी मिळवण्याचा पालिका पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.