आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Peon Post, Graduate, Post Graduates Try Their Luck

शिपायासाठी पदवी, पदव्युत्तर उमेदवारांनी आजमावले नशीब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : जिल्हा परिेषदेच्या परिचर या पदासाठी के. के. उर्दू हायस्कुलच्या केंद्रात इन कॅमेरा परीक्षा देताना विद्यार्थिनी.
जळगाव - जिल्हा परिषदेत शिपाई होऊ इच्छिणाऱ्या ७५१२ उमेदवारांनी रविवारी लेखी परीक्षा देऊन नशीब आजमावले आहे. पद कोणतेही असो, नोकरी मात्र शासकीय हवी; ही शासकीय नोकरीची क्रेझ यातून दिसून आली. त्यामुळे या पदासाठी अर्ज भरणाऱ्यांची संख्या ही हजारोच्या घरात होती. या परीक्षेसाठी बारावी उत्तीर्णची अट असताना पदवी, पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अधिक समावेश होता. १८ परिचर पदांसाठी ८६१८ उमेदवारांनी अर्ज केले होते, यातील ७५१२ उमेदवारांनी ही परीक्षा दिली, ११०६ जण गैरहजर होते. शहरातील ३० केंद्रांवर ही परीक्षा झाली. यात मराठी व्याकरणाच्या प्रश्नांनी अधिक अडचणीत आणल्याचे उमेदवारांनी सांगितले.

शहरातील सर्वच केंद्रांवर परीक्षा शांततेत सुरळीत पार पडल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने परीक्षेसाठी अधिक शाळा मिळवण्यात प्रशासनाला अडचणी आल्या नाहीत. परीक्षेसाठी ६०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत होते. शंभर गुणांसाठी प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे ५० वस्तुनिष्ठ प्रश्न ठेवण्यात आले होते. यात चालू घडामोडींसह सामान्यज्ञान, विज्ञान, भूगोल, गणित या वर काही प्रश्न होते. त्यासाठी दुपारी ते ३.३० असा दीड तासाचा वेळ देण्यात आला होता. परीक्षेत युवक-युवतींबरोबरच विवाहित महिला, पुरुषांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. परीक्षेनंतर उमेदवारांना प्रश्नपत्रिकेसह उत्तरपत्रिकेची प्रत देण्यात आली. प्रशासनाकडून उत्तरपत्रिका संकेतस्थळावर टाकली जाणार आहे.

राेजी ग्रामसेवक पदासाठी परीक्षा
बुधवारीकंत्राटी ग्रामसेवक ३५ स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदांसाठी १८ केंद्रांवर लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी ग्रामसेवक पदासाठी ४६८७ तर स्थापत्य अभियांत्रिकी पदासाठी ६६५ जणअसे एकूण ५३५२ उमेदवार परीक्षा देणार आहेत.

गैरहजरचे प्रमाण १३ टक्के
परीक्षेसाठी अर्ज भरूनही गैरहजर असलेल्यांचे प्रमाण हे १३ टक्के इतके राहिले. अनेक उमेदवार एकाचवेळी दुसऱ्या ठिकाणीही अर्ज भरतात. मात्र, सोईच्या ठिकाणीच परीक्षा देतात. त्यामुळे गैरहजरचे प्रमाणही वाढते, असेही प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.