आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरूपदाच्या १६ राेजी मुलाखती, राजभवनात २० जणांची अंतिम यादी तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी २० ज्येष्ठ प्राध्यापक -शिक्षणतज्ज्ञांची अंतिम यादी तयार करण्यात आली असून पुढील महिन्यात १६ ऑक्टोबर रोजी या सर्व उमेदवारांना राजभवनावर मुलाखती आणि सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात अाले आहे. सर्व उमेदवारांना मुलाखतीची तारीख आणि वेळेचे ई-मेल पाठवण्यात आले आहे.

सप्टेंबर रोजी कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या कुलगुरूपदी कुणाची वर्णी लागणार? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. विद्यापाठाच्या कुलसचिवांपासून ते विविध विभागाचे प्रमुख कुलगुरूपदासाठी इच्छुक आहेत. कुलगुरुपदावर यंदा भाजप -संघ परिवाराशी संबंधित उमेदवाराचीच निवड केली जाईल, असे सांगितले जाते. मात्र दिवाळीपूर्वी विद्यापीठाला नवा कुलगुरु मिळण्याची शक्यता आहे. राजभवनातून इच्छुक २० उमेदवारांची अंितम यादी तयार करण्यात आली असून संबंधितांना ई-मेलवर निमंत्रण पाठवण्यात आले आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी मुंबईत मुलाखती आणि सादरीकरणासाठी बोलविण्यात आले आहे. तर २० ऑक्टोबरपर्यंत नव्या कुलगुरुची नेमणूक होण्याची शक्यता आहे.
अंतिम यादीत यांचा अाहे समावेश
कुलगुरूपदासाठीनिवडण्यात आलेल्या अंतिम २० जणांमध्ये डॉ.व्ही.एल.माहेश्वरी (संचालक,स्कूलऑफ लाइफ सायन्सेस), डॉ.सत्येंद्रमिश्रा (माजीसंचालक,यूअायसीटी), डॉ.आर.डी.कुलकर्णी (संचालक,यूआयसीटी),प्रा.डॉ.अमोलबोरसे (केमिकलसायन्स), डॉ.पी.पी.माहुलीकर (संचालक,केमिकलसायन्स), डॉ.बी.व्ही. पवार (संचालक,काॅम्प्युटरसायन्स), डाॅ.डी.जी.हुंडीवाले (माजीसंचालक बीसीयूडी), डॉ.दिनेशगौतम (इलेक्ट्रॅानिक्सडिपार्टमेंट,फिजीकल सायन्स), डॉ.ए.एम.महाजन(कुलसचिव),प्राचार्यश्रीवास्तव (जीटीपी,नंदुरबार), डॉ.अशोकचव्हाण (परीक्षानियंत्रक,पुणे विद्यापीठ) आणिनागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॅ.येवले या १२ जणांचा अंतिम यादीमध्ये समावेश अाहे.
बातम्या आणखी आहेत...