आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायकलद्वारे विदेशी पर्यटकांचे भारतभ्रमण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: भारतभ्रमण करणारे ब्रिटनचे मार्क, क्लारा हे दांपत्य नेदरलँडचा रॉजर रहिवासी यांच्यासोबत मार्गदर्शक.
चोपडा - केल्यानेदेशाटन या उक्तीनुसार नुकतेच तीन युराेपीय पर्यटकांनी चोपडा तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्य सृष्टीचा,जैवविविधता आणि आदिवासी संस्कृतीचा लाभ घेतला. भारतभर सायकलीने भ्रमण करणारे ब्रिटनचे मार्क क्लारा हे दाम्पत्य रॉजर नेदरलँडचा रहिवासी आहे. त्यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. दुचाकीने त्यांनी पूर्ण भारत पिंजून काढला आहे. भारत फिरण्याची ितघांची प्रचंड जिद्द, उत्साह आणि महत्त्वाकांक्षा यामुळे त्यांनी हे भ्रमण करण्याचे धाडस केले.
मार्क, क्लारा, रॉजर हे तिघे विदेशी पर्यटक गाइडसोबत तीन दिवस वास्तव्यास होते. एक दिवस येथील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलमध्ये घालवला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत त्यांनी हितगुज केले.

तसेच वैजापूरमधील तेल्या घाटात राजेंद्र रनाळकर यांनी पर्यटकांशी भारतीय संस्कृती, शिक्षण पाश्चात्य संस्कृती यावर चर्चा घडवून आणली. मात्र, त्यांनी शहरातील अस्वच्छतेबाबतची आपली नाराजी प्रकट केली. ते ज्या सायकलीने फिरतायेत ती सायकल जर्मन बनावटीची असून ताशी ४० कि.मी धावते. त्यामुळे पर्यटक थकता या सायकलीवर प्रवास करून एक प्रकारे प्रदूषणमुक्तीचा संदेश ते देत असल्याचे दिसते. भारतभ्रमण करणारे ब्रिटनचे मार्क, क्लारा हे दांपत्य नेदरलँडचा रॉजर रहिवासी यांच्यासोबत मार्गदर्शक.

आदिवासींचे जीवन जाणले
मेमहिन्यात त्यांचा आग्रा दिल्ली येथे भारतभ्रमण दौरा समाप्त होणार आहे. ते रोजच्या घडामोडी चुकता रोजनिशीत नोंदवतात. त्यांनी कॅमे-यात भारतीय परंपरा, लोकसंस्कृती आदींचे छायाचित्रण केले आहे. रनाळकर त्यांचे मित्र मिलिंद पाटील यांनी विदेशी पाहुण्यांना आदिवासी बांधवांच्या जीवनाबद्दलची माहिती दिली.