आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाच्या धडकेने वनपाल जागीच ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहादा - तालुक्यातील कोटबंधणीहून म्हसावदकडे येताना अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने कोटबंधणी येथील वनपाल खगेश्वर तुकाराम लाम्हगे हे जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी वाजेच्या सुमारास झाला.

सैन्य दलातील नोकरीनंतर खगेश्वर लाम्हगे आठ वर्षांपूर्वी वनविभागात नोकरीला लागले होते. कोटबंधणीहून म्हसावदकडे येताना अज्ञात वाहनाने मोटारसायकलला शनिवारी कान्हेरी नदीच्या पुलानजीक धडक दिली. त्यामुळे ते ठार झाले. घटनेनंतर वरिष्ठ अधिकारी पी. पी. सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. याप्रकरणी वाहनचालकाच्या विरोधात म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या बछड्याने एका युवकावर हल्ला केला होता. या वेळी लाम्हगे यांनी त्या युवकाचे प्राण वाचवले होते. ते नुकतेच शहादा येथे राहण्यास आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मुलगी आहे.
बातम्या आणखी आहेत...