आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन विभागाच्या वाहनावर धडगाव घाटात गोळीबार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- धडगाव-शहाद्यादरम्यान नणंद-भावजय घाटात सहायक वनसंरक्षकाच्या वाहनावर गोळीबार केल्याची चित्तथरारक घटना मंगळवारी रात्री घडली. अधिका-याने प्रत्युत्तर म्हणून सहा राउंड फायर केले. मध्यरात्रीनंतर दुस-या एका घटनेत याच मार्गावर सागवानी लाकडाची तस्करी करणा-या चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 38 सागवानी लाकडाचे नग जप्त केले आहे.

सहायक वनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल हे वन विभागाच्या वाहनाने जात होते. त्या वेळी समोरून दोन वाहनातून 10 ते 12 जणांच्या टोळक्याने वाहनाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. दगडफेकही करण्यात आली. प्रत्युत्तर म्हणून सालविठ्ठल यांनी सहा राउंड फायर केले. या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांना कळवण्यात आली.