आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Corporator Sticked His Demise Wife Photo On Passport

माजी नगरसेवक केलेे यांनी पासपाेर्टमध्ये मृत पत्नीच्या नावाने लावला दुसरा फाेटाे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - नुकताच शिवसेनेला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणारे माजी नगरसेवक गोपाळ केले (लाड) यांच्यावर ठाणे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत पत्नीच्या नावे दुस-या महिलेचा फोटो चिकटवून त्यांनी पासपोर्ट काढल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवला आहे.
याबाबत बाळकृष्ण दामोदर अमृतकर यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार गोपाळ काशीनाथ लाड, भारती रवींद्र वाणी उर्फ भारती कोठावदे उर्फ भारती गोपाळ लाड (दोघे रा.पितृ छाया, नकाणेरोड, धुळे) यांनी संगनमत करून गुन्हेगारी स्वरूपाचा कट केला. तक्रारदार अमृतकर यांची चुलत बहीण तथा गोपाळ केले यांची पत्नी सुनंदा लाड यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. असे असताना गाेपाळ केले यांनी मृत पत्नीचा पासपोर्टवरील फोटो काढून त्यावर भारती या महिलेचा फोटो चिकटवला. यानंतर ही महिला आपली पत्नी असण्यासोबत पासपोर्टही खरा असल्याचे दर्शविले. त्याआधारे ठाणे येथील पासपोर्ट कार्यालयात तसे कागदपत्रे सादर करून परदेश प्रवास केला. २६ सप्टेंबर २००८ ते आजतागायत हा प्रकार घडला. अमृतकर यांच्या तक्रारीवरून गोपाळ केले संबंधित महिला यांच्यावर भादंवि कलम ४६५, ४६७,४६८,४७१,४२०,१२०-ब, सह भारतीय पासपोर्ट कायदा ३, १२ (१) (ब), (ड) प्रमाणे गुन्हा (९९/२०१५) दाखल केला आहे.

काय म्हणतात पोलिस
यातक्रारीबद्दल गुन्हे शाखेकडून सखोल तपास करण्यात आला. त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची तपासणी पडताळणी करण्यात आली. तक्रारीत तथ्य जाणवल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.