आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागासवर्गीय महामंडळांची कर्जे माफ करा, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढाेबळे यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शासनाने शेतकऱ्यांची कर्जे माफ केली; परंतु शेतकऱ्यांच्या शेतात राबणाऱ्या मजूर, मागासवर्गीय समाजाचा विचार केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळाची कर्जे माफ करावी, अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अनुसूचित जातींमध्ये भटक्या विमुक्तांप्रमाणे अ,ब,क,ड वर्गवारी जारी करावी, अशी मागणी माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढाेबळे यांनी पत्रकार परिषदेत केली. 
 
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाटेगाव ते चिरागनगरपर्यंत ते ३१ अाॅगस्टदरम्यान काढण्यात अालेली ‘संवाद यात्रा’ शुक्रवारी जळगावात अाली. या वेळी पद्मालय विश्रामगृहावर प्रा. ढाेबळे यांनी पत्रकारांशी बाेलत हाेते. संपूर्ण राज्यभर समाज प्रबोधनासाठी दाेन वर्षांतून एकदा ही प्रबाेधन यात्रा काढण्यात येते. यावर्षी ते ३१ अाॅगस्ट दरम्यान पाच विभागांमध्ये ही यात्रा जाणार अाहे. या यात्रेत रस्त्यातील गावांमधील वाड्या, वस्त्यांमध्ये जाऊन प्रबाेधन करण्यात येत अाहे. यात मातंग समाजात शिक्षण, अाराेग्य अाणि समाज प्रबाेधन या मुद्यांवर जागृती करण्यात येत अाहे. 

दरम्यान, अनुसूचित जातीमध्ये ६५ लाख संख्या असलेल्या बाैद्ध समाजाला वर्ग, २३ लाख असलेल्या मातंग समाजाला वर्ग द्यावा, माेची, हाेलार यासह इतर जातींना वर्ग अाणि इतर ५२ जातींचा वर्गात समावेश करण्याची मागणी प्रा. ढाेबळे यांनी केली. संवाद यात्रेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी राजस काेतवाल, माेहन चव्हाण,रवींद्र वाकळे, ज्ञानेश्वर सुरवाडे, स्वप्निल सपकाळे उपस्थित हाेते. 
 
प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक 
जळगावातदाखल झालेल्या संवाद यात्रेत प्रा. लक्ष्मणराव ढाेबळे यांनी अजिंठा विश्रामगृहात जिल्ह्यातील मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये समाज संघटन, प्रबाेधन, शिक्षण, अाराेग्य या विषयासंदर्भात चर्चा करण्यात अाली. संवाद यात्रेतील पुढील टप्प्यातील कार्यक्रमाची रूपरेषाही सांगितली. 
बातम्या आणखी आहेत...