आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Opposition Leader Eknath Khadse,latest News In Divya Marathi

मला मुख्यमंत्री व्हायचंय;शहाद्याच्या सभेतचे प्र खडसेंतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार- मलामुख्यमंत्री होण्याची संधी आहे. खान्देशातील माणसाने स्वप्न का पाहू नये?, खान्देशच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद आले तर काय वाईट आहे? कारण महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत फारच थोडे लोक असतात.
प्रतिभाताई पाटील या हुशार होत्या. परंतु त्यांच्याकडे लॉबिंग नव्हते म्हणून त्या मुख्यमंत्री होऊ शकल्या नव्हत्या. रोहिदास पाटील यांनाही मुख्यमंत्री होता आले नाही. कारण खान्देशात खेकड्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे खान्देशचा मुख्यमंत्री कुणी झाले नाही. असे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केले. शहादा येथे गुरूवारी उमेदवार उदयसिंग पाडवी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. राष्ट्रवादीत सर्वांत अधिक गुंड आहेत. याच गुंडांबरोबर काँग्रेसने १५ वर्षे संसार केला. आता हेच एकमेकांच्या विरोधात बोलत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी या जिल्ह्याला अविकसित ठेवण्याचे पाप केले आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावता धनगर कोळी समाजाला आरक्षण देण्याला पाठिंबा देण्यात यईल. वेळ पडल्यास घटनेत दुरुस्ती केली जाईल, अशी घोषणा एकनाथ खडसे यांनी शहादा येथील सभेत केली.
खेकड्यांची संख्या जास्त असल्याने खान्देशचा मुख्यमंत्री झाला नाही
उद्धव ठाकरेंना तर इतिहासच माहीत नाही. त्यांनी मला पाडण्यासाठी फतवा काढला आहे. फतवा तर जामा मशिदीचे इमाम काढतात. उद्धव ठाकरेंनी धर्मांतर कधी केले. ठाकरेंनी बोलण्यापूर्वी त्यांनी अभ्यास तरी करावा. ते म्हणाले, दिल्लीहून अफजल खानची फौज महाराष्ट्रात आली आहे. ठाकरेंना हे माहीत नाही की अफजल खान हे विजापूरचे होते. त्यांनी दिल्लीचे तोंड कधी पाहिलेच नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे दिल्लीतले अमित शाह महाराष्ट्रात येऊ शकतात? शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. येथे खडसे किंवा वळसे येऊ शकतील.
गावित बंधूची नीतिमत्ताच शिल्लक राहिली नाही
डॉ.विजयकुमार गावित यांचे बंधू आठवड्यात पक्षाचे मंगळसूत्र बदलतात. काही नीतिमत्ताच शिल्लक राहिली नाही. डॉ.गावितांसारखे एखादवेळा पक्ष बदलणे ठिक असते पण आठवड्यात तीन पक्ष बदलणाऱ्यांना काय म्हणावे?