आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षणात ४१ विद्यार्थी आढळले शाळाबाह्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शिक्षणविभागाच्या माध्यमातून शाळाबाह्य असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुषंगाने शनिवारी शहर आणि ग्रामीण भागात ४०० शिक्षकांच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ४१ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. शनिवारी सकाळी ते संध्याकाळच्या दरम्यान हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात अाले अाहे.

शिक्षण विभागाने एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शाळाबाह्य अर्धवट शिक्षण सोडून गेेलेल्या मुलांचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार शनिवारी शहर आणि ग्रामीण भागातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी ४०० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. या सर्व शिक्षकांनी सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत ग्रामीण भागातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले. कुऱ्हे पानाचे केंद्रांतर्गत १२ मुुले मुली, साकेगाव केंद्रात मुले मुली, किन्ही केंद्रात मुले, दीपनगरात मुले मुली, वरणगाव केंद्रात मुलगा मुलगी असे ते १४ वर्षे वयाेगटातील ४१ विद्यार्थी शाळाबाह्य अाढळले. सर्वेक्षणाला शिक्षक संघटनांनी तात्वीक विराेध दर्शवला हाेता. त्यामुळे हे सर्वेक्षण हाेते की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली हाेती. मात्र, सर्वेक्षण ठरलेल्या वेळेत पूर्ण झाले अाहे.

भुसावळ सर्वशिक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाचे पहिल्याच दिवशी वितरण केले जाते. यासाठी जूनच्या सुरुवातीलाच तालुकास्तरावर २७ लाख ८४ हजार २०० रुपयांचा निधी प्राप्त झाला हाेता. मात्र, तांत्रिक कारणास्तव तालुकास्तरावरील निधी शालेय व्यवस्थापन समितीच्या नावे वर्ग करण्यास विलंब झाल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय गणवेशाचे वितरण झाले नव्हते. यानंतर प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी पदभार घेताच गणवेशाचा निधी १६ जूनला वर्ग करण्यात आल्याने तालुक्यातील ७१ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तातडीने शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. याबाबतचा अहवाल मात्र अद्यापही सादर करण्यात अालेला नाही.

मुलांची संख्या जास्त
सर्वेक्षणात२६ मुले तर १५ मुली शाळाबाह्य अाढळल्या आहेत. यापूर्वीही शिक्षण विभागाच्या माध्यमातून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात अाले होते. या वेळी १६ मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब असल्याचे आढळून आल्याने त्यांना शिक्षण विभागाच्या माध्यमातून दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या सर्वेक्षणातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे.
शहरात रविवारीही सर्वेक्षण करण्यात अाले.
कौटुंबिक कारणास्तव अनेक अर्धवट शिक्षण सोडून द्यावे लागते. अशा मुलांचेही सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मुले तर

मुलींचा समावेश आहे.
शिक्षण हक्क कायद्याच्या हक्कानुसार सक्तीचे करण्यात आले आहे. यात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वेक्षणावर भर दिला.

अहवाल वरिष्ठांकडे देणार
शहरासहसंपूर्ण तालुक्यात शनिवारी सकाळी नियाेजनबद्धपणे करण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल. सर्वांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. काैटुंबिक कारणास्तव अर्धवट शिक्षण साेडलेल्या विद्यार्थ्यांच्याही नाेंदी सर्वेक्षणात घेण्यात अालेल्या अाहेत. आर.एस.बाेकाडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी