आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकीटबंद बिस्किटात आढळली बुरशी, पाकिटावर सप्टेंबर 2015 पर्यंत होती एक्सपायरी डेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील एका दुकानात पाकीटबंद वेफर बिस्किटांवर बुरशी लागलेली आढळून आली आहे. प्रिया गोल्ड कंपनीचे हे बिस्कीट आहे.

शहरातील हॉटेल ड्रिम लॅण्ड परिसरात राहणारे नीलेश वर्मा यांच्या सोबत हा प्रकार घडला आहे. वर्मा यांनी मंगळवारी घराजवळील एका दुकानातून प्रिया गोल्ड या कंपनीचे अडीच रुपये किमतीचे वेफर बिस्कीट खरेदी केले.
पाकिटातून बिस्कीट बाहेर काढले असता, त्यावर बुरशी लागलेली होती. तसेच दुर्गंधीही येत होती. त्यामुळे त्यांनी आणखी एक पाकीट खरेदी केले. त्यातही तसेच आढळून आले. त्यामुळे वर्मा यांनी आणखी अाठ पाकिटे खरेदी केली. मात्र, त्यांनी अद्याप ती फोडलेली नाहीत. सर्व पाकिटांची एक्सपायरी डेट सप्टेंबर २०१५ अशी आहे. त्यामुळे ही पाकिटे सध्या बाजारात विक्रीस खुली आहेत.
अधिका-यांनीघातली हुज्जत
वर्मायांनी बिस्किटाच्या पाकिटावरील ०१२०२५२२९३९ या कस्टमर केअर क्रमांकावर फोन करून याप्रकरणी कंपनीकडे विचारणा केली. कस्टमर केअरकडून वर्मा यांना महाराष्ट्राचे विक्री प्रमुख अग्रवाल यांचा क्रमांक मिळवला. वर्मा यांनी अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. शिवाय आपण कुठेही तक्रार करा, असा रोखीचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
अन्नऔषध प्रशासन करणार चौकशी
बुधवारीसायंकाळी वर्मा यांनी अन्न औषध प्रशासनाचे कार्यालय गाठले. त्यांनी सर्व हकिकत जाणून घेत लेखी तक्रार केल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अन्न औषध प्रशासनाकडून गुरुवारीच कंपनीच्या त्या उत्पादनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.