आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिडकीची ग्रील उचकटून श्रद्धा काॅलनीत चार ताेळे साेने लांबवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रामानंदनगर परिसरातील श्रद्धा काॅलनीत घरात कुणीही नसल्याची संधी साधून घरामागील खिडकीची लाेखंडी ग्रील उखडून चाेरट्यांनी चाेरी केली. यात त्यांनी कपाटातील ताेळे साेने, ३० हजार रुपये राेख अाणि ३० हजार रुपयांचे विक्रीसाठी अाणलेले कपडे लंपास केले. घरमालक रविवारी रात्री घरी परतल्यानंतर चाेरी झाल्याचे लक्षात अाले. तसेच विनोबानगरात देखील घरफोडी झाल्याचे रविवारी उघडकीस आले.

श्रद्धा काॅलनीत प्लाॅट क्रमांक ३मधील ‘साहस’ बंगल्यात साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता बळीराम माळी या कुटुंबीयांसाेबत राहतात. शनिवारी सकाळी त्या पाराेळा या त्यांच्या मूळ गावी कामानिमित्त गेल्या हाेत्या. काम संपवून त्या रविवारी रात्री वाजेच्या सुमारास घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा त्यांना उघडाच असल्याचे लक्षात अाले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले, तर वरच्या मजल्यावर दाेन्ही कपाटांच्या लाॅकरमधील सामान चाेरट्यांनी लंपास केल्याचे अाढळून अाले.

दाेन लाखांचा एेवज लंपास
चाेरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर वरच्या मजल्यावरील बेडरूमच्या कपाटातील सामान तपासले अन् अस्ताव्यस्त केले. लाॅकरमध्ये ठेवलेले ताेळे साेन्याचे दागिने, ३० हजार रुपये राेख, एक लॅपटाॅप चाेरट्यांनी लंपास केला. तसेच माळी यांच्या मैत्रिणीने दुकानात विक्रीसाठी अाणलेल्या जीन्स पॅण्ट अाणि साड्या असे एकूण ३० हजारांचे कपडे, बेन्टेक्सचे दागिनेही चाेरट्यांनी लांबविले. मात्र, चाेरटे महागडे घड्याळ अाणि गाॅगल टाकून गेले. त्यानंतर चाेरट्यांनी पुढच्या दरवाजाचे लॅच उघडून पाेबारा केला. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिसांना माहिती दिल्यानंतर उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

विनाेबानगरात घरफाेडी
शिरसोलीरस्त्यावरील विनोबानगरातील रमेश भारतीया हे १५ दिवसापांसून पुणे येथे मुलांकडे गेलेले आहेत. त्यांच्या बंद घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. रविवारी सकाळी साफ-सफाई करण्यासाठी आलेल्या वाॅचमनच्या ही गाेष्ट लक्षात आली. त्यानंतर एमअायडीसी पोलिसांनी भारतीयांच्या घराची पाहणी केली. या चाेरी संदर्भात घरमालकांना फाेनवरून माहिती दिली अाहे. दरम्यान, दाेन अाठवड्यांपूर्वी या परिसरात मोठी घरफोडी झाली हाेती.

किचनची ग्रील उखडून केला प्रवेश
घरालाकुलूप असल्याने चाेरट्यांनी कंपाउंडमध्ये प्रवेश करत पुढच्या दरवाजाच्या बाहेर असलेल्या लाेखंडी दरवाजाचे कुलूप ताेडले. मात्र, मधल्या दरवाजाला लॅच लाॅक लावलेले हाेते. त्यामुळे चाेरट्यांना ते उघडता अाले नाही. त्यामुळे त्यांनी घरात शिरण्यासाठी दुसरा मार्ग शाेधला. चाेरट्यांनी मागील बाजूला जाऊन दरवाजा ताेडण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी किचनच्या मागे असलेल्या खिडकीची ग्रील ताेडण्याचा प्रयत्न केला. चाेरट्यांनी सुरुवातीला लाेखंडी टॅमीने खिडकीच्या बाहेरील ग्रील बांधकामातून उखडून काढली. त्यानंतर अातली ग्रीलही त्याच पद्धतीने उखडून घरात प्रवेश केला.
बातम्या आणखी आहेत...