आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चोरांचा दिवाळी धमाका; सात दिवसांत चार गाड्यांची चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दिवाळीला अालेल्या सलग सुट्ट्यांमुळे अनेक कर्मचाऱ्यांसह अधिकारी अापल्या गावाकडे गेले अाहेत. हिच संधी हेरून चाेरट्यांनी सध्या उच्छाद मांडला अाहे. बंद घरांचे कडी-काेयंडे ताेडून चाेरीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत माेठी वाढ झालेली दिसून येेते.
अनेक ठिकाणी दुकानांनाही चाेरट्यांनी लक्ष केल्याचे दिसून येते. परंतु, याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत अाहे. दरम्यान, पाेलिसांकडून रात्रीची गस्त सुरू असूनही चाेऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसते. पाेलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात अाहे.

अशी घ्यावी काळजी
शहरातसध्या दुचाकी चाेरट्यांनी धुमाकूळ घातला अाहे. मात्र, दुचाकी चाेरी हाेऊ नये म्हणून नागरिकांनी थाेडी काळजी घेतली, तर दुचाकीचाेऱ्यांवर नियंत्रण येऊ शकते. दुचाकीमालकाने हॅण्डल लाॅक अावश्य केले पाहिजे, व्हील लाॅक असेल तर चांगले. दुचाकी लावल्यानंतर अाजूबाजूच्या दुकानदारांना, विक्रेत्यांना सांगून जावे. तसेच बिग बझारसारख्या ठिकाणी सुरक्षारक्षकाजवळ दुचाकी लावली पाहिजे.

चोरटे गजबजलेली ठिकाणे करताहेत टार्गेट
दुचाकीचाेरटे गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करताहेत. त्यात बिग बझारचे पार्किंग, गाेलाणी मार्केट, फुले मार्केट, बीजे मार्केटचे पार्किंग, अजिंठा चाैक यासारख्या गर्दीच्या ठिकाणी लावलेल्या दुचाकींना चाेरटे लक्ष्य करतात.

घटना : जिल्हासामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाइकाला पाहण्यासाठी नाेव्हेंबरला दुपारी वाजता सुरेश बाबुराव जाेशी (वय ४३, रा.शिंगाेटे, ता.जामनेर) अाले असताना त्यांनी दुचाकी (एमएच-१९-बीपी-११८७) पार्किंगमध्ये लावली. दुपारी वाजता ते रुग्णाला बघून परत अाले. तेव्हा त्यांची दुचाकी जागेवर नव्हती. जाेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पाेलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात अाला आहे.

घटना: खान्देशसेंट्रल माॅलमधील बिग बझारमध्ये नाेव्हेंबरला सायंकाळी वाजता काझी नफीस अहमद नुशिराेद्दीन (वय ४२, रा.सागर अपार्टमेंट, मलिकनगर, मेहरूण) खरेदीसाठी अाले हाेते. त्यांनी त्यांची स्प्लेंडर-प्राे दुचाकी (एमएच-१९-सीए-६३११) पार्किंगमध्ये लावली. खरेदी करून काझी रात्री वाजता परत अाले, त्या वेळी त्यांची दुचाकी जागेवर नव्हती. काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी शहर पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

घटना: अजिंठाचाैकातील महाराजा हाॅटेलमध्ये ११ नाेव्हेंबरला रात्री वाजता अाेमप्रकाश हरिराम साेनी (वय ४०, रा. बालाजीपेठ) जेवणासाठी अाले असता, त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच-१९-यू-२२०३) हाॅटेलसमाेर पार्किंगमध्ये लावली हाेती. जेवण करून रात्री वाजता परत अाल्यानंतर साेनी यांची गाडी जागेवर नव्हती. त्यांनी रविवारी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

घटना: पाेलिसमुख्यालयात कार्यरत असलेले पाेलिस कर्मचारी शशिकांत मांगाे साळुंके (वय ४७, रा.पाेलिस हाैसिंग साेसायटी, शाहूनगर) हे रविवारी दुपारी वाजता गाेलाणी मार्केटमध्ये खरेदीसाठी अाले हाेते. त्यांनी त्यांची हीराे पॅशन-प्राे (एमएच-१९-सीए-६३११) अग्निशमन विभागाच्या कार्यालयासमाेर लावली. दुपारी १.३० वाजता खरेदी करून परत अाल्यानंतर त्यांची दुचाकी चाेरी झाल्याचे त्यांच्या लक्षात अाले. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात अाला आहे.