आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरातच चार दिवस मृतदेह पडून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कंजरवाड्या मागील लक्ष्मीनगर भागातील भाड्याच्या घरात राहणाऱ्या ४० वर्षीय प्रौढाचा शुक्रवारी दुपारी मृतदेह आढळून आला. गेल्या चार दिवसांपासून त्यांचा मृतदेह पडून होता. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

अनिल अाेंकार चौधरी त्यांचे कुटुंब हे १५ मे रोजी इंदूर येथे नातलगाच्या लग्नाला गेले होते. चौधरी हे १६ मे रोजी इंदूरहून लग्नकार्य आटोपून घरी परतले होते. तर पत्नी, तिन्ही मुली मुलगा हे सर्व तेथेच मुक्कामाला थांबले होते. दिवस होऊनही घराचा दरवाजा उघडत नसल्याने नागरिकांचा संशय बळावला. तसेच दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जगदीश देवरे यांनी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिलमध्ये दाखल केला. याप्रकरणी नातलग बबन चौधरी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, चौधरी यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अनिल चौधरी हे जळगाव -भुसावळ मार्गावर पॅजिओ गाडी चालवत होते. दोन वर्षांपासून ते लक्ष्मीनगरात भाड्याने घर घेऊन राहत होते. त्यांचे दोन भाऊ जळगावात तर भाऊ भोपाळ येथे राहत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...