आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरणा नदीने तीन महिन्यांत घेतले चार बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नदीत पोहण्याच्या उद्देशाने येणार्‍या मुलांसाठी गिरणा पंपिंग ठिकाण जिवघेणे ठरले आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान शाळकरी व महाविद्यालयीन चार मुलांचा म़ृत्यू झाला आहे. नदीपात्रात झालेल्या अवैध वाळू उत्खननामुळे नदीत मोठे खड्डे तयार झाले आहेत, याच खड्डय़ांच्या कपार्‍यात अडकून पोहणार्‍यांना जीव गमवावा लागतो आहे.

शाळकरी मुले शाळेला दांडी मारून नदीत पोहण्यासाठी येण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. या पूर्वी रायसोनी महाविद्यालय व नूतन मराठा महाविद्यालयातील मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शहरापासून दूर असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी पिकनिकसाठी जात असतात. पिकनिकमधला पोहण्याचा मोह जीवाशी येतो आहे. शनिवारी प्रगती विद्यालयातील आठवीतील विद्यार्थी कपिल माळी याचाही मृत्यू अशाच प्रकारामुळे ओढवला.

एकच सुरक्षारक्षक
गिरणापात्राजवळ असलेल्या पंपिंग स्टेशनची निगा राखण्यासाठी महापालिकेतर्फे सुरक्षा रक्षक नेमलेला आहे. नदीकडे जाण्याच्या मार्गावर असलेला हा सुरक्षारक्षक मुलांना हटकतो खरा, पण कुणीही ऐकून न घेता थेट नदीपात्र गाठून पोहण्यासाठी जातातच. या शिवाय सुरक्षारक्षकला टाळून पुढे जाण्याचा पर्यायी रस्ताही शोधला आहे. नदीपात्राजवळ सुरक्षेसंदर्भात कोणतीही काळजी घेतलेली दिसून येत नाही. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालावे अशी अपेक्षा आहे.