आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Lane In Bhusaval Land Acquisition In Last Stage

चौपदरीकरण - भूसंपादन अंतिम टप्प्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 95 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. भुसावळ आणि मुक्ताईनगर या दोन्ही तालुक्यांमधील 6 लाख 66 हजार 894.87 चौरस मीटर क्षेत्रापैकी, 5 लाख 40 हजार 11 चौरस मीटर क्षेत्र महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर 1 लाख 26 हजार 883.48 चौरस मीटर क्षेत्र आणखी ताब्यात घेतले जाणार आहे. उर्वरित पाच टक्के क्षेत्र हे सरकारी मालमत्ता क्षेत्र असून ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यानुसार धुळे-अमरावती या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. सध्या भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यातून जाणार असल्याने दोन्ही तालुक्यातील 1795 शेतक-यांची जमीन संपादित करण्याचे उद्दिष्ट आहे. 1280 शेतक-यांची जमीन संपादित झाली आहे. चार महिन्यांपूर्वी महामार्गाच्या कामाला सुरुवात केली जाणार होती. मात्र भूसंपादनाची प्रक्रिया लांबल्याने एल अँड टी कंपनीने कामाचे सर्व साहित्य परत नेले आहे.

वरणगाव शहर होणार बायपास
वरणगावजवळून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. वरणगाव येथील कामासाठी लागणारी सर्वच जमीन संपादित झाली आहे. त्यामुळे वरणगाव येथील कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही तालुक्यातील भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महामार्गासाठी जागा देण्यास नकार देणा-या शेतक-यांना प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांनी नोटिसा दिल्या आहेत. नोटिसांनंतर जमीन संपादित केली जाईल.

सरकारी मालकीच्या जागेचे संपादन
ग्रामपंचायत, शासकीय जागा अथवा ज्या जागेच्या वारसदारांमध्ये वाद आहे, अशा केवळ पाच टक्केजागेचेच संपादन बाकी आहे. शासनाच्या आदेशानंतर शासकीय जमीनही लवकरच ताब्यात घेतली जाणार आहे. शासनाच्या तिजोरीतील निधी दुस-या संबंधित कार्यालयाकडे वर्ग करून जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.