आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइलमध्ये चार मिनिटांची व्हिडिओ क्लीप; निवडणुकीत वापरला जाणार फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नवीन तंत्रज्ञानामुळे स्थानिक निवडणुकांवरही सोशल मीडियाचा प्रभाव दिसून येत आहे. यातून महापालिका निवडणूकही सुटलेली नाही. आता थेट चार मिनिटांची व्हिडिओ क्लीप स्मार्ट मोबाइलवर सहज उपलब्ध होणार आहे. एकाच वेळी हजारो नागरिकांना ही क्लिप पाठविणे शक्य होणार आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘स्मार्ट वर्किंग’ होण्याच्या उद्देशाने अनेक कंपन्यांनी नवनवीन सॉफटवेअर विकसित केले आहे. त्यामुळे मतदार याद्या अल्फाबेटप्रमाणे नावांची यादी, जातीनिहाय यादी तयार करण्याची सोय यातून उपलब्ध झाली. त्याचसोबत इंटरनेटच्या माध्यमातून व्हाइस आणि टेक्स एसएमएसची सोयदेखील या सॉफटवेअर कंपन्यांनी क रून दिली आहे. त्याहून पुढे जाऊन आता मोबाइलवर चार मिनिटांची व्हिडिओ क्लीपची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे हा फंडा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांना वापरता येणार आहे. उमेदवारांना व्हिडिओ क्लीपद्वारे मतदारांपर्यंत त्यांचे विचार सहज पोहचवता येणार आहेत.

अशी आहे सुविधा
आतापर्यंत व्हाइस एसएमएस पाठविता येत होते. पण व्हिडिओ क्लीपचा एसएमएस थेट मोबाइलमधील मेसेजच्या इनबॉक्समध्ये जाऊन पडणार आहे. त्यात असलेल्या लिंकवर क्लीक केल्यानंतर ती क्लीप मोबाइलवर पाहता येणार आहे. ती क्लीप क ॉम्प्युटरमध्येही पाहता येईल. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात हा फंडा उमेदवारांना वापरता येणार आहे.

सामाजिक कार्यासाठी सॉफ्टवेअरचा उपयोग
पुणे येथे सामाजिक कार्यासाठी ह्या सॉफटवेअरचा उपयोग केला जातो आहे. नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ या सॉफटवेअरचा वापर करावा या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशीदेखील चर्चा झाली आहे. पालिकेच्या निवडणुकीत या सॉफटवेअरचा वापर झाला आहे.
-किरण भाटिया, आयटी पेंटिंग ग्रुप

आपत्ती व्यवस्थापनाचे क्लीप्स
अपघात झालेल्या रुग्णाला रुग्णालयात कसे आणावे, भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी काय केले पाहिजे. फॅरचे प्लास्टर कसे बांधायचे याबाबतच्या व्हिडिओ क्लीप मोबाइलद्वारे पाठविल्या जाताहेत. याच सॉफ्टवेअरद्वारे एखाद्या अपघाताची माहिती देता येऊ शकते.

तरुणांवर प्रभाव
इंटरनेटमुळे फेसबुकची भुरळ सगळ्यांनाच पडली आहे. युवावर्गात याचे फॅड विशेष दिसून येत आहे. व्हिडिओ ऑन मोबाइल असे या सॉफटवेअरचे नाव आहे.