आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराची तोडफोड करून चौघांना बेदम मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- समतानगर परिसरातील वंजारी टेकडीजवळ राहणाऱ्या एका तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तीन तरुणांनी किरकोळ कारणावरून मारहाण केली. तसेच तिघांनी भिंती पाडून घरातील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी सोमवारी रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समतानगरातील राजू मांगीलाल जाधव (वय १८) या तरुणाला काही दिवसांपासून अज्ञात व्यक्ती फोनवरून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत होती. राजूला रविवारीही धमकी देण्यासाठी फोन आला. मात्र, त्यानेच समोरच्या व्यक्तीला धमकी दिल्याने दया (पूर्ण नाव माहीत नाही), भावेश वंजारी पिंट्या राठोड या तिघांनी राजूसह त्याचे वडील मांगीलाल जाधव (वय ५२), आई वैजयंतीबाई जाधव (वय ४५) बहीण कविता जाधव (वय १९) यांना मारहाण केली.

साहित्याची तोडफोड
राजूलामारहाण करण्यासाठी आलेल्या तिघांनी त्याच्या अपंग अाईला चाकूचा धाक दाखवला. तसेच त्यांना बकऱ्या विक्रीतून मिळालेले १० हजार रुपये हिसकावून घेतले. या झटापटीमध्ये त्‍यांच्या गळ्यातील हजार रुपये किमतीची सोनसाखळी तुटली. तसेच मोटारसायकल (क्र.एमएच-१९-बी-३३२९)सह जाधव यांच्या घरातील साहित्याची तोडफोड करून घराची भिंत पाडली. याप्रकरणी राजू जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजूवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.