आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Police Men Suspended In Chawariya Murder Case

चावरिया खून प्रकरणात चाैघा पाेलिसांचे निलंबन- विशेष पाेलिस महानिरीक्षक चाैबे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भुसावळातील मल्ल माेहन बारसेंच्या खुनातील अाराेपी नट्टू चावरियावर पाेलिस बंदाेबस्तात असताना बसमध्ये गाेळीबार झाला. यात त्याचा बुधवारी मृत्यू झाला. याप्रकरणी धुळे पाेलिस मुख्यालयातील चाैघा पाेलिसांना निलंबित करण्यात अाले अाहे, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक विनयकुमार चाैबे यांनी येथे दिली.

खुनातील अाराेपी नट्टू चावरिया गाेपाळ शिंदे हे दाेघे धुळे कारागृहात हाेते. बुधवारी भुसावळ येथील नाहाटा चाैफुलीवर बसमध्ये नट्टु चावरियाचा खून झाला. मात्र, नट्टूला पाेलिसांचे जे पथक बसने न्यायालयात अाणत हाेते, त्यातील सहायक फाैजदार अंकुश शिरसाठ, जयकुमार चाैधरी, सुभाष ठाकूर, संजय चव्हाण या चाैघांना धुळे पाेलिस अधीक्षकांनी निलंबित केल्याची माहिती विशेष पाेलिस महानिरीक्षक चाैबे यांनी भुसावळात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बाेलताना दिली.

विशेष वाहनांचा विचार: पाेलिसांच्या ताब्यात असलेल्या ज्या अाराेपींवर हल्ला हाेण्याची शक्यता अाहे, त्यांना विशेष वाहनाच्या माध्यमातून न्यायालयात नेण्यासंदर्भात विचार केला जाईल. निलंबित केलेल्या चाैघा पाेलिसांची चाैकशी करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

संताेष बारसेसह नऊ अाराेपी
गाेळीबारप्रकरणी संशयित अाराेपी अमित परिहार, सागर बारसे या दाेघांना अटक करण्यात अाली अाहे. त्यांना गुरुवारी भुसावळ न्यायालयात हजर करण्यात अाले. पाेलिसांनी अाराेपींचे पाेलिस काेठडीचे हक्क राखून अाेळख परेडसाठी दाेन दिवसांची न्यायालयीन काेठडीची मागणी केली. न्यायाधीश एम.एम. बवरे यांनी ती मान्य केली. अाराेपींतर्फे प्रफुल्ल पाटील तर सरकारी पक्षातर्फे अॅड. नबाब अहमद यांनी काम पाहिले. तपासाधिकारी मनाेज पवार उपस्थित हाेते. दरम्यान नट्टू चावरियाच्या खूनप्रकरणी संताेष बारसे, दीपू बारसे, पापा बारसे, मिथून बारसे, भुऱ्या बारसे, हिरामण जाधव ऊर्फ गाेजाेऱ्या, पिद्या यांनाही अाराेपी करण्यात अाले अाहे. संताेष, दीपू पापा बारसे या तिघांनाही गुरुवारी अटक करण्यात अाली.

पाेलिस संरक्षणाची मागणी
मृत नट्टू चावरियाची अंत्ययात्रा गुरूवारी रात्री ९.४५ वाजता वाल्मीक नगरातून काढण्यात आली. नंतर अंत्ययात्रा थेट बाजारपेठ पाेलिस ठाण्यासमोर आणून चावरिया कुटुंबियांनी पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली. पाेलिसांनी कारवाई करण्याचे अाश्वासन दिल्यानंतर अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे रवाना झाली. यावेळी पाेलिसांचा ताफा बंदाेबस्तासाठी तैनात हाेता.

पिस्तूलचे कनेक्शन
बसमध्येनट्टू चावरियावर गाेळीबार करण्यासाठी जे गावठी पिस्तूल वापरले, ते मध्य प्रदेशातील सिंगुर येथून विकत घेतल्याचे सागर बारसेने पाेलिसांना दिली. शहरात अातापर्यंत काेणी तेथून किती पिस्तूल अाणले अाहेत? मध्य प्रदेशातून भुसावळपर्यंत शस्त्रांची तस्करी करण्याची माेडस अाॅपरेंडी काय अाहेे? याची माहिती पाेलिस संकलित करीत अाहेत.