आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकी वाहन बाजारात ऑफर्सचा पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उन्हाळ्यातील तीन महिने ग्राहकांची प्रतीक्षा करणार्‍या ऑटोमोबाइल मार्केटला खराब मान्सूनचाही जबर धक्का बसला आहे. गेल्या दीड महिन्यापासून चौकशीसाठीदेखील ग्राहक फिरकत नसल्याने विविध कंपन्यांनी ग्राहकांवर ऑफर्सची बरसात सुरू केली आहे. रोख खरेदीवर काही प्रमाणात सूट, इन्शुरन्स फ्री यासारख्या योजना अनेक कंपन्यांनी जाहीर केल्या आहेत.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारख्या मुुहूर्तावर ऑटोमोबाइल मार्केटचा व्यवसाय अवलंबून असतो. या मुहूर्तावर मिळणारा प्रतिसाद कसा असेल, हे जून आणि जुलैमध्ये होणारा पाऊस, पिकांची स्थिती यावर अवलंबून असते. यावर्षी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत मान्सूनचे आगमन न झाल्यामुळे शेतीसह इतर इंडस्ट्रिला मोठा फटका बसला आहे. यात ऑटोमोबाइल क्षेत्राचादेखील समावेश आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर्सवर भर दिला आहे.
ऑफर्सला प्रतिसाद
ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या ऑटोमोबाइल कंपन्यांच्या ऑफर्समुळे भविष्यात वाहन खरेदी करू इच्छिणारे ग्राहक चौकशीसाठी येत आहेत. गेल्या महिन्यात पूर्णपणे ठप्प असलेल्या ऑटोमोबाइल मार्केटमध्ये गाड्यांमधील फीचर्स, ऑफर्स याबाबत चौकशी करण्यासाठी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
या आहेत आकर्षक ऑफर्स
शेरोलेटने 60 ते 80 हजार रुपयांपर्यंत थेट फायद्याची योजना आणली आहे.
टोयाटोने लिवा, ओटिवॉस यासारख्या गाड्यांवर रोख सूट देण्यात आली आहे.
महिंद्राच्या गाड्यांवर हाफ इन्शुरन्स फ्रीची ऑफर आहे.
ह्युंदाई आणि होंडानेदेखील ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आहेत. यात रोख सूट, इन्शुरन्स फ्री आणि फीचर्सचा समावेश आहे.
मारुतीने मॉडेल निहाय वेगळ्या योजना दिल्या.